आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगले विचार कृतीत उतरवण्याच्या पाच पद्धती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च पदावर काम करणा-या लोकांमध्ये एक समान वैशिष्ट्य असते, त्यांना दुस-यांकडून काम करून घेण्याची पद्धत अवगत असते. याच एका वैशिष्ट्यावर त्यांच्यामधील पुढे जाण्याची क्षमता अवलंबून असते. ही संकल्पना खूप सरळ आहे. मात्र काहीजणच याद्वारे चांगले परिणाम साध्य करण्यात यशस्वी होतात. इतरांना कामासाठी प्रेरित करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन हॅबिट’ म्हणजेच विचारांना कृतीत उतरवायला शिकले पाहिजे. तुम्ही पुढील काही पद्धतींनी अ‍ॅक्शन हॅबिट विकसित करू शकता..
* परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहू नका. कारण तुम्ही चांगली परिस्थिती येण्याची वाट पाहाल तर कधी सुरुवातच करू शकणार नाहीत. दरवेळी काहीतरी असे घडेल, जे अनुकूल नसेल. कधी वेळ नसेल तर कधी मार्केट डाऊन असेल तर कधी तगडी स्पर्धा असेल.
* गोष्टींचा सराव करायला शिका. त्यांच्याविषयी फक्त विचार करत राहिल्याने फायदा होणार नाही. तुम्हाला व्यायाम सुरू करायचा असो किंवा बॉसला चांगल्या आयडिया देऊन त्यांच्यावर प्रभाव पाडायचा असेल, ते आजच करा. उद्याविषयी विचार करत राहिल्याने नुकसानच होईल. कारण असे करत राहिल्यास येणा-या परिस्थितीविषयी आपण चांगला विचार करणारच नाहीत. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल.
* फक्त चांगला विचार सुचल्याने यश मिळत नाही. विचार आवश्यक आहे. मात्र, त्याचा उपयोग तेव्हाच होईल, जेव्हा तो योग्य पद्धतीने लागू होईल. कृतीत उतरवलेला एक सामान्य विचार कोणत्याही केवळ विचारच राहिलेल्या असामान्य विचारांपेक्षा कित्येक पटींनी उत्कृष्ट असतो.
* पाऊल उचलल्याने भयावर विजय मिळवता येतो. तुम्हाला काही लोकांसमोर बोलायची भीती वाटत असेल तर त्यांच्यासमोर अवश्य बोला. त्यामुळे तुमची भीती नष्ट होईल. कृती करण्यासाठीचे पहिले पाऊल खूप कठीण असते. एकदा पाऊल उचलल्यानंतर आत्मविश्वास वाढेल. भीती आपोआपच नष्ट होईल.
* क्रिएटिव्ह होण्यासाठी दरवेळी प्रेरणेची गरज नसते. तुम्हाला चित्र काढायचे असल्यास कागद आणि रंग घेऊन बसा. चित्राद्वारे काही सांगायचे आहे, असा विचार करा. मेंदूवर जोर द्या. तुम्ही जशी सुरुवात कराल, तसतसे नवे विचार सुचू लागतील. तुम्ही स्वत:ला चांगले होण्यासाठी प्रेरितही कराल.