आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका क्लिकवर अचूक माहिती देणारे गुगल झाले 16 वर्षांचे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेकंदाचाही विलंब न करता तुम्हाला अचुक माहिती देणारे गुगल आज 16 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त गुगलने एक खास पेज तयार केले आहे. आजच्या दिवसासाठी गुगलने अ‍ॅनिमेटेड होमपेज तयार केले आहे.
वाढदिवसाच्या तारखेचा इतिहास
गुगल कंपनी 7 सप्टेंबर 1998 रोजी स्थापन झाली. कंपनीच्या स्थापनेपासून 2004 पर्यंत कंपनी 7 सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु 2005 पासून कंपनीने 27 सप्टेंबर हा दिवस वाढदिवसाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे 27 सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस 27 सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली.