आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल कोट्यवधींचे गॅजेट्स दान देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल्फाबेट ही गुगलची मूळ कंपनी कर्मचाऱ्यांसाठी भरपूर सेवा, सुविधा देण्याकरिता प्रसिद्ध आहे. कंपनीचे यावर्षीचे धोरण आणखी नवे आहे. कर्मचाऱ्यांना हॉलिडे गिफ्ट म्हणून मिळालेले लाखो रुपये किमतीचे संगणक, फोन तसेच अन्य गॅजेट्स एकत्र केले जात आहेत. ही सर्व अत्याधुनिक उपकरणे गरजूंना दान केली जाणार आहेत.
गुगलविषयी आणखी एक बाब म्हणजे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना सतत नवे तंत्रज्ञान आणि गॅजेट्सच्या संपर्कात ठेवते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत येथील कर्मचाऱ्यांना आधुनिक नेक्सस फोन, क्रोमबुक, लॅपटॉप आणि अँड्रॉइड स्मार्टवॉचसारखे गॅजेट्स मिळाले आहेत. यावर्षी मात्र कंपनीने वेगळी योजना आखली. कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेली २०४ कोटी रुपयांची आधुनिक तंत्रज्ञान सामग्री शाळांमध्ये वाटली जाणार आहे.

कॉर्पोरेट घराण्यांचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने सांगितले की, अल्फाबेटचे हे धोरण सांस्कृतिक उत्तरदायित्वाचा एक भाग आहे. यासाठीच अल्फाबेटने बहुधा सेल्फ ड्रायव्हिंग कार, इंटरनेट बलूनसारख्या प्रकल्पांत कमी खर्च करायचे ठरवले असावे.}globaladvisors.biz
बातम्या आणखी आहेत...