आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Takes Quantum Leap Into Artificial Intelligence

इंटरनेट, माेबाइलनंतर नवीन क्रांती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) च्या नवीन संशाेधनांचा आमच्या जीवनांवर तसाच प्रभाव पडण्याची शक्यता आहे, जसा यापूर्वी माेबाइल आणि इंटरनेट क्रांतीमुळे पडला हाेता. मात्र, तरीही एआयच्या पूर्ण क्षमतेचा उपयाेग करून घेण्यासाठी आपल्याला वेगळ्या दृष्टिकाेनाची गरज आहे. हे तंत्रज्ञान आपल्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. ते अशा प्रकाराचा शाेध लावू शकते की ज्यांना मनुष्य शाेधू शकत नाही. इंग्रजी बाेलणारे हिंदी किंवा चिनी बाेलणाऱ्यांशी संवाद साधून व्हिडीआे काॅल करू शकतात.

या तंत्रज्ञानाची पुढील उडी ही डेटा उपलब्ध करून दिल्यास अनेक समस्यांची उकल करू शकेल. उदाहरणार्थ संगणकाच्या व्यवसायात खूप सारी माहिती गाेळा केल्यानंतर परिणामांमध्ये सुधारणा करण्याचा उपयुक्त सल्ला मिळणे संभव आहे. एआयद्वारे रुग्णाच्या जुन्या दुखण्यांची माहिती डाॅक्टरांना त्वरित उपलब्ध हाेऊ शकते. काेणत्या गाेळीची अॅलर्जी किंवा त्यासंदर्भातील माहिती डाॅक्टरांना त्वरीत मिळू शकणार आहे. त्यामुळे रुग्णांचे जीवन वाचू शकते. या कृत्रिम बुद्धिमत्तेला तंत्रज्ञानाशी संबंधित डाटाचा उपयाेग करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. ही माहिती खूप वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मात्र, माणसाच्या लक्षात त्यातील काहीच भाग राहू शकताे. मनुष्य भावनिक प्रसंगांमध्ये निर्णय घेण्यात हयगय करू शकताे, तसे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हाेणार नाही. ते काेणत्याही दबावाविना निर्णय घेऊ शकेल.

नकाेशा परिणामांपासून दूर राहायचे असेल तर अधिक चांगल्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. ही सिस्टिम तसेच करीत आहे का , ज्याची आपल्याला जरूरत आहे. आपल्याला त्यातील त्रुटी सुधारण्याची याेजना आहे का ? या सर्व प्रश्नांवर विचार करण्याची गरज आहे. अखेरीस हे तंत्रज्ञान मनुष्याच्या उपयाेगित्वावर अवलंबून आहे.

अधिक प्रगत तंत्रज्ञान
डीपमाइंडच्या एल्गाेरिथमसारख्या इन्वेटिव्ह आर्टिफिशिअल इंटेलीजन्स १९८० साली अटारी व्हिडीआे गेमला शिकू इच्छितात. ते प्रत्येक गेममध्ये आपली रणनीती सुधारू शकते. त्याला नियम सांगण्याची गरज उरत नाही. आयबीएमचे डीप ब्लू संगणकासारखा जुना पुराणा काॅम्प्युटर अशा कृत्रिम तंत्रज्ञानाच्या साॅफ्टवेअरसाठी उपयुक्त ठरू शकत नाही.

स्मिडअल्फाबेट इनकार्पाेरेटचे अध्यक्ष,काेहेन गुगल आयडीआजचे संचालक आहेत.