आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षीदार म्हणून हजर व्हावे लागलेले पहिले अ‍ॅटर्नी जनरल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाल दिवा असलेल्या सरकारी गाडीत बसायचे, अशी वाहनवटी यांची लहानपणीपासूनची इच्छा होती. यूपीएने दुसर्‍यांदा सत्ता स्थापन केली, त्या वेळी त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्याआधी वाहनवटी महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. अ‍ॅटर्नी जनरलपदी नियुक्ती झालेले ते देशातील पहिलेच मुस्लिम आहेत. तसेच न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर होणारेही ते पहिलेच अ‍ॅटर्नी जनरल आहे. 2 जी प्रकरणी सीबीआयने त्यांची न्यायालयात चौकशी केली. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली असल्याचे त्यांचे निकटवर्तीय आणि मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याबरोबर काम करणारे जनक द्वारकादास यांचे म्हणणे आहे.

वडील इसाभाई गुलामहुसेन वाहनवटी यांच्याबरोबर 1972 पासून ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत होते. त्यांचे आजोबा-पणजोबा जहाज बांधणीची कामे करायचे. गुजरातीमध्ये वाहन म्हणजे जहाज असा अर्थ होते. त्यामुळे त्यांचे आडनाव वाहनवटी असे पडले. ते 26 वर्षांचे होते, तेव्हाच त्यांच्या वडिलांचे अल्सरमुळे निधन झाले. वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्यावर एकाच वेळी अनेक खटल्यांची जबाबदारी आली. त्यासाठी त्यांना 18-18 तास काम करावे लागले. ते एका दिवसात 70 खटल्यांवर काम करायचे, असे त्यांचे सहकारी दिनयार मेदन म्हणतात.

वाहनवटी यांचा मोठा मुलगाही वकील आहे. वडील दिल्लीत राहतात, पण सुटी मिळताच ते मुंबईला जातात, असे ते सांगतात. त्यांच्याकडे एक छोटीशी लाल डायरी असते. त्यात लहान लहान अक्षरांमध्ये काही निर्णय आणि खटल्यांची टिपणे लिहिलेली असतात. वकिलीच्या सुरुवातीच्या काळात ते ही डायरी खिशातच ठेवत होते. आज ज्युनियर वकील जुन्या खटल्यांसाठी धूळ खात पडलेले मोठमोठे व्हॉल्यूम शोधतात. एका-एका वाक्यासाठी तीन ते चार तास शोधाशोध करावी लागते. सध्याच्या वकिलांना हेही कळत नाही की, जे ब्रीफ करायचे आहे त्याचे ड्राफ्टिंग कसे करावे? सर्वकाही रेडिमेड मिळेल, असे त्यांना वाटते, असे ते सांगतात.

०गुलामहुसेन एस्साजी वाहनवटी : देशाचे अ‍ॅटर्नी जनरल
> जन्म : 7 मे 1949
> शिक्षण : सेंट मेरी स्कूल, आयसीएसई (माझगाव), सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई.
> कुटुंब : जुमाना पहिली पत्नी, दुसरा विवाह आणि दोन मुले