आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिभेचा परीसस्पर्श कुटुंबातील सदस्यांनाही..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अग्रगण्य टेक्नोक्रॅट्समध्ये गणना होणार्‍या गोपीचंद यांच्या कामाचा प्रभाव त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. गोपीचंद यांचा प्रभाव असलेल्या त्यांच्या 9 वर्षांच्या पुतण्याने त्यांच्यासमोर नोकरीचा प्रस्तावही ठेवला होता. 13 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी त्याने स्वत: तयार केलेली सोशल नेटवर्किंग साइट गोपीचंद यांना दाखवली व म्हणाला, काका, ‘तुम्ही मुलांसाठी चित्रपट तयार करा, मी ते माझ्या वेबसाइटवर अपलोड करेन.’ या कामासाठी किती पैसे देणार, असे गोपीचंद यांनी विचारले असता प्रत्येक चित्रपटासाठी 300 डॉलरची ऑफर त्याने दिली होती. हा मोबदला खूप कमी असल्याचे सांगत गोपीचंद यांनी त्याला एक अट घातली व म्हटले, ‘ही ऑफर मी स्वीकारू शकतो, मात्र चित्रपट पाहणार्‍याकडून एक डॉलर वसूल करायचा.’ पुतण्याने स्पष्ट नकार दिला व म्हणाला, तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून एक पैसाही घेणार नाही व जाहिरातीतून पैसे कमावण्याचे बिझनेस मॉडेल कदापि बदलणार नाही. एका लहान मुलाचा हा निश्चय पाहून गोपीचंद थक्क झाले.

अमेरिकेतील ओवा स्टेट विद्यापीठातून डॉक्टरेट करताना गोपीचंद इंडियन स्टुडंट युनियनचे अध्यक्षदेखील होते. कॅम्पसमध्ये पाकिस्तानी दूतावासाकडून आयोजित काश्मीर प्रश्नावरील एका परिसंवादात भारताच्या झालेल्या अपमानाला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. गोपीचंद यांनी हायस्कूलपर्यंत कॉम्प्यूटरला हातही लावला नव्हता. डीआयडीओमध्ये प्रशिक्षणार्थी असताना प्रथम त्यांनी कॉम्प्यूटर हाताळले. तेथे पंचकार्डवर कॉम्प्यूटर वापरले जात असे. सामाजिक कार्यात आवड असलेले गोपीचंद इंडियन लीडरशिप अँड लिटरसी नावाची एक एनजीओदेखील चालवतात. ‘इनोव्हेशन’ नावाचे एक पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

कुटुंब : पत्नी सीमा, दोन मुले, प्रणव व अदिती.
शिक्षण :इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स व डॉक्टरेट
3 ऑगस्ट रोजी टाटा समूहात प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी पदावर रुजू होतील. टाटामध्ये या पदावर येणारे ते पहिलेच टेक्नोक्रॅट आहेत.
(फोटो - गोपीचंद कटरगड्डा)