आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लबाडाघरचे निमंत्रण
विधानसभा निवडणुकांचे ढोल आता वाजू लागले आहेत. सत्ताधारी पक्ष केलेल्या कामाचे श्रेय घेण्याच्या तर विरोधक आंदोलनांतून लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी भोसेसह 10 गावांना मिळावे यासाठी पाच दिवस उपोषण केले. चौथ्या दिवशी त्यांनी गनिमी कावा करून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे सोडली आणि सरकारला त्याची दखल घेऊन पाणी देण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले. मात्र आंदोलनाचे श्रेय घेण्याची घाई झालेल्या खाडेंनी उपोषण सुटताच गोपीनाथ मुंडेंच्या उपस्थितीत विजयी मेळावाही घेतला. आता इतकी वर्षे लोकांना पाण्यासाठी झुलवत ठेवणा-या आघाडी सरकारचे पाणी देण्याचे आश्वासन खरोखरच पूर्ण होणार की लबाडाघरचे निमंत्रण, हे 31 मार्चलाच ठरेल.

अखेर दादा सांगलीत
राष्ट्रवादीतील दुस-या फळीच्या नेत्यांचा स्वत:चा गट निर्माण केल्यापासून अजितदादा पवार यांनी सांगली जिल्ह्यात यायचे टाळले होते. गेल्या दोन वर्षांत दादांचे चार वेळा कार्यक्रम ठरले आणि रद्द झाले. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील आणि आर.आर.पाटील असे राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते आहेत. मात्र या दोघांवरही नाराज असलेल्या दुस-या फळीतील नेत्यांचाही एक गट आहे. त्यांना राज्य पातळीवर कोणी वाली नव्हते. या नेत्यांना अजितदादांनी आश्रय दिला आणि त्यांनी दुष्काळी फोरमच्या माध्यमातून जयंत पाटलांना शह देण्यास सुरुवात केली. आता सांगलीत यायचे तर दादांना स्पष्ट करावे लागले असते की दुष्काळी फोरमशी आपला संबंध नाही. म्हणून दादांनी सांगलीत यायचेच टाळले होते. परवा मात्र ते कोल्हापूरला जाता जाता आले आणि कोणत्याही वादावर भाष्य न करता गेले.

पुढे आणखी वाचा................................................................................