आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Got Marriage With Google Fonder's Sister, And Final Ready For Diveroce

ज्यांच्या घरात गुगल सुरू केले, त्यांच्याच बहिणीशी लग्न, अन् घटस्‍फोटाची तयारी....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांच्र्या घरात गुगल सुरू केले, त्यांच्याच बहिणीशी लग्न, अन् घटस्‍फोटाची तयारी....
०सर्गेई मिखाइलोविच ब्रिन : गुगलचे संस्थापक
> जन्म : 21 ऑगस्ट 1973, सोव्हिएत संघ
> आई-वडील : ऑगीनिया आणि मायकल ब्रिन (आई यहुदी, वडील रशियन)
> कुटुंब : 2 मुलांचे वडील, अ‍ॅना व्होजसिस्की यांच्याशी घटस्फोटाची तयारी
> यश : गुगलच्या संस्थापकांपैकी एक.
> संपत्ती : 1543 कोटी रुपयांहून अधिक
सर्गेई सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोव्हिएतची राजधानी मास्कोतून कुटुंबासह अमेरिकेतील मॅरीलँडमध्ये स्थलांतर केले. त्यांना पेंट ब्रांच माँटेसरी स्कूल अ‍ॅडेल्फी येथे प्रवेश दिला. वडील मॅरीलंड विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. मातृभाषा असल्यामुळे सर्गेई यांना रशियनही येत होती. ग्रॅज्युएट फेलोशिपसाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले असतानाच लॅरी पेज यांची भेट झाली.
दोघांनी मिळून 1998 मध्ये गुगलची स्थापना केली. दोघांनी सुसन व्होजसिस्की यांच्या घरातील तळमजल्यावर या सर्च इंजिनवर काम सुरू केले आणि आज सुसन या गुगलच्या उपाध्यक्षा आहेत. 2007 मध्ये सुसन यांची छोटी बहीण अ‍ॅनाशी सर्गेर्इंनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा आणि छोटी मुलगी. अ‍ॅना जैव तंत्रज्ञान विश्लेषक आहे. ब्रिन यांच्यासोबत तिने ‘23 अँड मी’ नावाची कंपनी सुरू केली आहे. 23 चा अर्थ 23 गुणसूत्रांच्या जोड्या असा आहे. दोघांनी रुग्णांना मदत करणारी ब्रिन व्होजसिस्की संस्थाही स्थापन केली. दान करणा-या बड्या 50 संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश आहे.
अनेक वर्षांपासून ते पत्नीपासून वेगळे राहत आहेत. कंपनीतील 26 वर्षांची मार्केटिंग मॅनेजर अमाडा रोसनबर्ग हिच्यावर त्यांचे प्रेम असल्याचे बोलले जाते. अमाडा गुगल ग्लासचे काम पाहते आणि सर्गेई नेहमी गुगल ग्लास घालत असतात.