आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांनी सांगितले होते दलित तरुणांनी उद्योगाकडे वळावे; या आहेत योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशानुसार अनुसूचित जाती व नवबाैद्ध तरुण उद्याेगाकडे वळावे, यासाठी शासन अर्थसाहाय्य करणा-या विविध याेजना राबवत अाहे. यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत १० जुलै १९७८ मध्ये महामंडळाची स्थापना करण्यात अाली अाहे. महामंडळाचे भागभांडवल ५०० काेटी अाहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.

अशा अाहेत राज्य शासनाच्या याेजना
प्रकल्पासाठी ५० टक्के अनुदान याेजना - ५० हजारांपर्यंत प्रकल्प, उद्याेग सुरू करायचा झाल्यास प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजारांपर्यंत अनुदान देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. या कर्जाची फेड तीन वर्षांत करावी लागते.

प्रशिक्षण याेजना : अनुसूचित जातीच्या लाभार्थीसाठी व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक काैशल्य प्राप्त करण्यासाठी विनामूल्य ३ ते ६ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. यात शिवणकला, ब्यूटीपार्लर, इलेक्ट्रिक वायरमन, टर्नर, फिटर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेकॅनिकल, संगणक प्रशिक्षण, माेटार वायंडिंग, फेब्रिकेटर्स, वेल्डर, अाॅटाेमाेबाइल रिपेअरिंग, पेंटिंग, मशरुम, वाहनचालक, चर्माेद्याेग, घड्याळ दुरुस्ती, फाेटाेग्राफी, कंपाेझिंग, बुक बायंडिंग, सुतारकाम, माेबाइल दुरुस्ती याचे प्रशिक्षण दिले जाते. या साेबत स्थानिक प्रशिक्षणार्थ्यास ३०० रुपये, महापालिका क्षेत्रात ५०० रुपये, तर जिल्ह्याबाहेरील प्रशिक्षणार्थ्यास ६०० रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,
-  बीज भांडवल याेजना
- पंतप्रधान राेजगार निर्मिती याेजना
- केंद्रीय महामंडळाच्या याेजना
- संपर्क कुठे साधावा
 
 
 
 
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
- ऑक्‍सफोर्ड विद्यापीठाच्‍या ज्ञानवंत व्‍यक्‍तींच्‍या यादीत बाबासाहेब, वाचा जगभरातील विद्यापीठांनी केलेला सन्‍मान
बातम्या आणखी आहेत...