आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल कलाम: मैत्र जपणारा प्रेमळ माणूस -सुधा वसंतराव गोवारीकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. वसंत गोवारीकर आणि डॉ. कलाम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. तिरुअनंतपुरमला भारताच्या अवकाशझेपेची पायाभरणी होत होती तेव्हा सुरुवातीपासून म्हणजे जवळपास १८ वर्षे या दोघांनी एकत्र काम केले. ऐन उमेदीचा काळ या दोघांनी एकत्र व्यतीत केला. २१ नोव्हेंबर १९६९ या दिवशी भारताचे पहिले रॉकेट आकाशात झेपावले. अवकाश मोहीम यशस्वी करण्याचा आत्मविश्वास या रॉकेटने भारताला दिला. या रॉकेटच्या निर्मितीत डॉ. गोवारीकर आणि डॉ. कलाम या दोघांचाही महत्त्वाचा सहभाग होता. पहिल्या यशस्वी रॉकेट उड्डाणानंतर दोघांनीही एकमेकांचे अभिनंदन केले होते. पुढे अवकाश मोहिमेतून डॉ. कलाम ‘डीआरडीओ’मध्ये गेल्याने पूर्वीसारखा रोजचा संपर्क राहिला नाही. दोघांमधली आत्मीयता आणि मैत्री मात्र शेवटपर्यंत टिकून होती. अगदी गेल्या वर्षी डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन होईपर्यंत. गेल्या वर्षी डॉ. कलाम पुण्यात आले असता मुद्दाम वेळ काढून ते आमच्या घरी आले. दोन्ही मित्रांच्या गप्पा झाल्या.
मैत्रीच्या नात्याने त्यांनी काही सूचना अगदी हक्काने केल्या. ‘तब्येत चांगली व्हायला हवी,’ असा प्रेमळ दम देऊनच डॉ. कलाम गेले. डॉ. गोवारीकरांचे ऑपरेशन झाल्यावरही डॉ. कलाम आठवणीने भेटायला आले होते. नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेशनच्या एका पुस्तकातही डॉ. कलाम यांनी डॉ. गोवारीकर यांचे कर्तृत्व सांगणारा एक लेखही लिहिला.
पुढे वाचा... दुर्मिळ माणूस, ज्ञानी शास्त्रज्ञ