आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त गॅसमुळे ग्रीन कारचा मंदावला वेग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत लोकांनी प्रत्येक प्रकारची ग्रीन कार खरेदी करणे सुरू केले आहे. इकडे, गॅसचे दर उतरल्याने ऑटोमोबाइल कंपन्यांनी विक्रीचा वेग एकसमान ठेवण्यासाठी मोठ्या डिस्काउंटचा आधार घेतला आहे. सप्टेंबरमध्ये ९०००० हायब्रिड इलेक्ट्रिक आणि बॅटरीवर चालणार्‍या कारा विकल्या होत्या. २०१३ च्या तुलनेत हे ३० टक्के अधिक आहे. इलेक्ट्रिक ड्राइव्ह ट्रान्सपोर्टेशन असोसिएशनच्या (ईडीटीए) अनुसार इलेक्ट्रिक, बॅटरी कारांची विक्री ८५ टक्के वाढली आहे.

ग्रीन कारांची विक्री गॅसच्या किंमती वाढण्याशी संबंधित आहे. गेल्या महिन्यात ग्रीन कारांच्या विक्रीत ३० टक्के घट झाली. तिकडे, गॅसचे दर तीन डॉलर प्रति गैलनपर्यंत पोहोचले. २०१०च्या नंतर गॅसचे दर इतक्या कमी प्रमाणात घटले आहेत. तेलाच्या किमती ८० डॉलर प्रति बॅरल झाल्या आहेत. यात घसरण चालू राहिल्याने गॅसदेखील स्वस्त होईल. यासोबतच पेट्रोल, डीझेल इंजिनांच्या सक्षमतेने ग्रीन कार डीलर्सच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकन परिवहन विभागानुसार सामान्य कार ६.४ लिटरमध्ये १०० किमी चालते. ओबामा सरकारद्वारे लागू नियमांमुळे हे सरासरी ४.३ लिटरमध्ये १०० किलोमीटर होईल. कार्स.कॉमचे संपादक पेट्रिक ओल्सेन म्हणतातै, गॅस स्वस्त झाल्याने लोक कार चार्ज करत नाही.

इलेक्ट्रिक कार रिचार्जिंग केल्याविना १६० किमीपेक्षा पुढे जाऊ शकत नाही. फोर्डचे सेल्स गुरू एरिक मर्केल सांगतात, बॅटरी , गती, रिचार्जिंग अशा अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. इ. स. २००० च्या आसपास गॅसचे दर घटल्यावर मोठ्या एसयूव्ही कारचा बाजार तापला होता. दर वाढल्याने लोक कमी इंधनवाले पर्याय शोधू लागले. ऑटोनिर्माता २०१६ पर्यंत इलेक्ट्रिक, बॅटरी कारांचे वीस नवे मॉडेल सादर करणार आहेत.

कारचा वायुवेग
इलेक्ट्रिक, बॅटरी कारांची विक्री वाढवण्यासाठी कार कंपन्या किंमत कमी करत आहेत. फोर्डने आपल्या फोकस इलेक्ट्रिकची किंमत ३ लाख ६८ हजार रुपये घटवून १८ लाख ४४ हजार रुपये केली आहे. २०१४ आणि २०१५ ची चेवी व्होल्ट २०१३ च्या मॉडेलपेक्षा ३ लाख रु. स्वस्त आहे. कॅलिफोर्नियाची लक्झरी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने लीजवर कारांचे भाडे २५% घटवले आहे.

समस्यांचा ब्रेक
इलेक्ट्रिक आणि बॅटरी कारांचे दोन प्रकार बाजारात आहेत. त्या बीएमडब्ल्यू आय ८ सारख्या खूप महागड्या (८३ लाख रु.) आहेत. किंवा लहान कारांसोबत खर्चिक बॅटरी टेक्नोलॉशी जोडलेली आहे. त्याच्याने कारची किंमत वाढते. अलीकडेच एका आटोमोटिव्ह परिषदेत फोर्डच्या एका अधिकार्‍याने मान्य केले की, प्लग इन कारांची मागणी वाढण्यासाठी इंडस्ट्रीला किफायतशीर कार बनवावी लागेल.