आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीत दाखवले कौशल्य, उधारीवर सुरू केली कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेंस विल्सडोर्फ
जन्म : २२ मार्च १८८१, जर्मनी
संस्थापक : रोलेक्स
हेंसच्या बालवयातच त्यांच्या आईचे निधन झाले. आई गेल्याचा धक्का वडिलांना सहन झाला नाही. त्यांचेही निधन झाले. ही घटना १९९३ ची आहे. त्या वेळी हेंस अवघ्या १२ वर्षांचे होते. हेंसच्या काकांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय विकून त्यांच्यावर असलेले कर्ज फेडले. यातून शिल्लक राहिलेले पैसे मुलांना चांगल्या शिक्षणासाठी खर्च केला. तीन भाऊ-बहिणींमध्ये हेंस हे आई-वडिलांचे दुसरे पुत्र होते. बालपणात विल्सडोर्फची आवड गणित आणि भाषेत होती. यात त्यांना अनेक देशांची यात्रा करणे आणि तेथे काम करण्यास मदत मिळाली.

सुरुवातीला त्यांनी जगभरात मोती निर्यात करणार्‍या फर्ममध्ये काम केले. तेथे वैश्विक कारभाराच्या युक्त्या शिकल्या. हेंस यांनी सुरुवातीचा अनुभव आपल्या जीवनात अंगिकारला. १९३१मधील एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, मी निर्यातीतले बारकावे शिकण्यापासून सुरुवात केली असती तर मी आज राहिलो नसतो जो आज आहे.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला हेंसची घड्याळ व्यवसायाची यात्रा सुरू झाली. मोतींचा व्यवसाय सोडून १९ वर्षांचा असताना ते स्वित्झर्लंड गेले. तेथे १९०० मध्ये हेंसने त्या वेळची सर्वात मोठी घड्याळ निर्यातक कंपनी कुनो कोर्टनमध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी जगभरातील विविध भागधारकांसोबत भागीदारीने इंग्रजीत पत्रव्यवहार करण्याचे काम मिळवले. ८० फ्रेंक प्रत्येक महिन्याला वेतनावर हे काम सुरू केले. या काळात जिनेवासोबत चाउक्स दे फोन्ड्स घड्याळ निर्माती कंपनीचा हब होता. तेथे हेंस यांची ओळख इंडस्ट्रीच्या अनेक मोठ्या व्यक्तींशी झाली. या ओळखीतून आलेल्या अनुभवातून शिकवण घेत त्यांच्या मदतीने रोलेक्स कंपनीची स्थापना केली.

१९०३ मध्ये हेंसने स्वित्झर्लंड सोडले आणि लंडनला आले. याकाळात आपल्याला काय करायचे हे डोक्यात निश्चित केले होते. ते घड्याळाचे निर्माता बनण्याचे स्वप्न होेते. ते काही दिवस स्थगित करून एका घड्याळाच्या कंपनीत काम सुरू केले. चार-पाच वर्षांच्या अनुभवातून हेंस यांनी एक गोष्ट शिकली की सर्व घड्याळाचा कंपन्या जुन्या मापदंडानुसार चालत आहे. कोणतीच नवी डिझाइन आणि आवश्यक बदल करत नाही. हेंसने हीच आपली ताकद बनवली. ते शक्य तेवढ्या लवकर आपले काम सुरू करू इच्छित होते. जमवलेली रक्कम त्यांच्याकडे होती आणि मार्केटमधून त्यांना काही रक्कमही मिळणार होती. तेव्हा त्यांनी बहिणीकडून उधारीवर पैसे घेतले.

२४ वर्षांच्या वयात १९०५ मध्ये त्यांनी विल्सडोर्फ अ‍ॅण्ड डेव्हिस नावाने लंडनमध्ये घड्याळ बनवण्याची कंपनी सुरू केली. त्यांची पहिल्या घड्याळाचे वैशिष्ट्य होते एक ट्रॅव्हलिंग वॉच. जे पोर्टफोलियो घड्याळ म्हणून संबोधले जाते. हेंसने यात लेदरचा वापर केला. परंतु, ती हातात बांधण्याची घड्याळ नव्हती. परंतु येणारा काळ हातात घड्याळ बांधण्याचा आहे, हे हेंस यांनी ओळखले होते. एका ठिकाणी त्यांनी लिहिले आहे की, पॉकेट वॉचपेक्षा मनगटी घड्याळ उत्कृष्ट ट्रेण्ड ठरेल. यामागे त्यांचा विचार होता की, हीच घड्याळ एका पिढीतून दुसर्‍या पिढीच्या हातात पोहाेचेल. यानंतर हेंसने जगभर यात्रा सुरू केली. २ जुलै १९०८ ला हेंसने स्वित्झर्लंडमध्ये रोलेक्स ट्रेडमार्क रजिस्टर केला. याकाळात १९१५ला ब्रिटिश सरकारने लक्झरी उत्पादनांवर निर्यात ड्यूटी वाढवून ३३ टक्के केली. त्यामुळे हेंसने १९१९ मध्ये एक कार्यालय स्वित्झर्लंडला सुरू केले आणि तेथेच स्थाियक झाले.

- १९२६ मध्ये हेंस यांनी पहिली वॉटरप्रूफ घड्याळ "ओयेस्टर’ बनवली. त्यानंतर १९४५ मध्ये अशीच हाताची घड्याळ बनवली, ज्यात तारीख आपोआप बदलत होती. पहिल्या घड्याळाचे श्रेयदेखील हेंस यांनाच जाते.
- आज रोलेक्स जगभरात सर्वात मोठा लक्झरी वॉच ब्रँड आहे. ते प्रत्येक वर्षी सहा लाख ५० हजारांपासून ८ लाखांपर्यंत घड्याळे बनवतात. त्यांची वार्षिक उलाढाल तीन बिलियन डॉलर (सुमारे 186 अरब रुपये) इतकी आहे.
- जेम्स बाँड सिरीजची सुरुवात चित्रपटात प्रसिद्ध कलाकाराने रोलेक्सची घड्याळ घातली. शिन कॉनेरीपासून हा सिलसिला सुरू होऊन ब्रासनन पर्यंत चालला.