आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Anniv - कोणी म्हणतो \'सेक्स गुरू\' तर कोणी \'तत्त्वज्ञानी\', जाणून घ्या OSHO यांच्याबद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यात्माच्या क्षेत्रात रजनीश (OSHO) यांचे नाव अजरामर आहे. अध्यात्माचे आणि ध्यान प्रक्रीयेचे पुरस्कर्ता असलेल्या या व्यक्तीने आपले संपूर्ण जीवन लोकांना एका वेगळ्या विचारांनी जीवन जगण्यास प्रेरीत केले. त्यांचे विचार त्यांचे तत्त्वज्ञान आज अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवत आहे. त्यांच्या प्रवचनांचे जवळपास 600 पुस्तके आज अनेकांच्या जीवनात पथदर्शकाचे काम करत आहेत.

व्यवसायाने तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० ला प्रवचन देण्यास सुरूवात केली. त्यांनी सार्वजनीक वक्ते म्हणून या काळात देशभर प्रवास केला. या प्रवचनांमधून त्यांनी समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्या. तसेच लैंगिकतेसंबंधी त्यांची स्पष्ट आणि उघड मते यांमुळे भारतातील आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्यांना 'सेक्स गुरू' अशी उपाधी देऊन टाकली. मात्र ओशोंचे विचार ज्यांना पटले तो त्यांचा भक्तच होऊन जातो.

१९६० पासून आचार्य रजनीश म्हणून तर १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यानंतर पुढे १९८९ पासून त्यांना जगभरात ओशो अशी ओळख मिळाली. १९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला.
भारतभर प्रवास केल्यानंतर ओशोंनी १९७० मध्ये काही काळासाठी मुंबईत वास्तव्य केले. तेथे त्यांनी शिष्य जमवण्यास सुरूवात केली. येथे त्यांची भूमिका अध्यात्मिक शिक्षक अशी होती. त्यांनी आपल्या व्याख्यानात धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणावर टीका टीप्पणी केली. तर काही लिखाणाचे समर्थनही केले. यानंतर त्यांनी १९७४ मध्ये पुण्यात जाऊन आश्रमाची स्थापना केली. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते.

पुढील स्लाईडवर वाचा, ओशो यांच्या जीवनाबद्दल