आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदी, उत्साही मनाचा संबंध थेट आराेग्याशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंदी राहणाऱ्यालाेकांचे आराेग्य चांगले राहते. नवीन संशाेधनानुसार असे लक्षात आले आहे की आपला मूड आपले आराेग्य कसे चांगले राखताे. हा निष्कर्ष लॅन्सेट पत्रिकेत प्रकाशीत नवीन अहवालात आहे. सर्वेक्षणात मध्यमवयीन लाख २० हजार महिलांवर अनेक वर्ष नजर ठेवून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दृष्टीकाेनाचा स्वास्थ्यावर उपयुक्त प्रभाव पडताे. मेंदूची स्थिती आणि शरीराचा संबंध याबाबतचे एकदम नवीन संशाेधन आहे.

मूडचाशस्त्रक्रीयेवरही परिणाम - डिसेंबर२०१५ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार जर तुमचा मूड चांगला नसेल तर शस्त्रक्रीयादेखील प्रभावित हाेते. संशाेधन करणाऱ्यांनी अशा २३० लाेकांना बघितले ज्यांच्या रक्तनलीकेत कॅथेटर लावण्यात आले हाेते. त्यांना भावना सांगणारे शब्द आणि विशेषणांचे रेटींग निश्चित करायला सांगण्यात आले. ज्यांची भावना नकारात्मक हाेती, शस्त्रक्रीयेदरम्यान त्यांच्या ह्दयाची गती धीमी झाली, रक्तदाब असामान्य झाला.

संतापआणि ह्दय - २०१५च्या अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की संतापाच्या नंतर त्यापुढील दाेन तासात ह्दयाचा झटका येण्याची शक्यता तब्बल आठपट वाढताे. संशाेधकांनी हे शाेधून काढले आहे की संतापाने तयार झालेला तणाव ह्दयाच्या ठाेक्यांना आणि रक्तदाबाला वाढवते. रक्तनलीका आकुंचित व्हायचा आणि रक्तात गुठळ्या हाेण्याचा धाेका वाढताे.

आश्चर्याचाभाव आणि उत्तेजीतपणा- २०१५च्या एका संशाेधनानुसार आश्चर्याच्या भावामुळे उत्तेजना वाढवणारे घटक घटतात. उत्तेजीत हाेण्याचा संबंध टाईप - मधुमेहापासून गाठी हाेण्याच्या आजारापर्यंत निगडीत आहे. अभ्यासात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विचारण्यात आले की त्यांना काही भावनांनी कसे वाटते . आनंदाच्या भावनेचा कमी उत्तेजनेशी संबंध आढळला. एकाग्रताआणि जाडपणा - आॅक्टाेबर२०१५ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार त्या क्षणात एकाग्र हाेणाऱ्या लाेकांच्या शरीरात जाडेपणा कमी आहे. माइंडफुलनेसच्या उच्च स्तराच्या लाेकांमध्ये एकाग्रतेच्या बाबतीत कमजाेर पुरुष आणि महिलांमध्ये जाडेपणा ३४ टक्के अधिक हाेता. संशाेधक असे मानतात की जे लाेक एकाग्र आहेत, ते प्रामुख्याने आराेग्य आणि आहाराबाबत सजग असतात.

दृष्टिकाेन आणि म्हातारपण
येलपब्लिक हेल्थ स्कूलच्या अभ्यासानुसार म्हातारपणाबाबत काही व्यक्तींचा विचार हा त्यांच्या मेंदूच्या आयुष्यावरही परिणाम करताे. म्हातारपणाला नकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या मेंदूतील हिप्पाेकेम्पसचा हिस्सा खूप कमजाेर पडून गेला आहे. त्यावर खूप माेठा थर चढून गेला आहे. ही दाेन्ही लक्षणे अल्जायमरच्या आजाराची आहेत. संशाेधकांचे असे म्हणणे आहे की अल्जायमरमुळे मेंदूत हाेणाऱ्या बदलांतील माहिती प्रथमच समाेर आली आहे.
बातम्या आणखी आहेत...