आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विदेशात चांगल्या संस्थेत शिक्षण घेण्याची अनेक तरुणांची इच्छा असते; पण त्याचे आईवडील आणि स्वत: विद्यार्थी शैक्षणिक कर्जाबाबत संभ्रमात असतात. त्याच्या मनात काय शंका असतात हे या दोन उदाहरणांतून समजता येईल.
केस 1 : जितेंद्र परदेशी विद्यापीठात शिक्षण घेऊ इच्छित होता, ज्याची फी 12 लाख रुपये होती. यासाठी तो 10 लाखांचे कर्ज आणि उर्वरित रक्कम रक्कम स्वत:कडून जमा करू शकत होता; पण विदेशात शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज घ्यावे की नको? याविषयी त्याच्या मनात संभ्रम होता. तो आपल्या वडिलांना जामीनदार आणि घर तारण ठेवण्यास सांगण्यासाठी कचरत होता. जर तो कर्ज भागवण्यास असर्मथ ठरला तर त्याच्या आईवडिलांची एकमेव स्थावर संपत्तीदेखील धोक्यात येईल, अशी भीती त्याच्या मनात होती. तो संभ्रमात होता आणि त्याला माझ्याकडून सल्ला हवा होता.
केस 2 : प्रसन्नाच्या (वय 50 वर्षे) घरात दोन मुले, पत्नी आणि आईवडील होते. त्याचे उत्पन्नदेखील ठीकठाक होते. त्याने 30 व्या वर्षी घेतलेले गृहकर्जदेखील फेडले आहे. मोठा मुलगा स्वत:च्या पायावर उभा राहिल्यानंतर त्याची बचत वाढली होती. आता तो आपल्या निवृत्ती काळासाठी पैसा जमा करत होता. दरम्यान, त्याच्या दुसर्या मुलाला विदेशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेशाची संधी मिळाली आणि तो शैक्षणिक कर्ज काढू इच्छित होता. यासाठी प्रसन्नाला आपले घर तारण ठेवावे लागत होते. त्यांना भीती होती की मुलगा यशस्वी न झाल्यास राहते घरदेखील हातचे निघून जाईल.
उपाय : जितेंद्र आणि प्रसन्ना दोघांची समस्या जवळपास सारखीच असून पैलू मात्र वेगवेगळे होते. मी जितेंद्रसोबत सविस्तर चर्चा केली आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तो हा कोर्स का करू इच्छितो? तो ज्या विषयाचा कोर्स करणार होता तो त्याचा आवडता विषय होता. तसेच तो ज्या विद्यापीठात हा कोर्स करणार होता ते विद्यापीठ यासाठी प्रसिद्ध होते. हा कोर्स वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर फायदेशीर होता. कोर्स केल्यानंतर त्याला तो काम करत असलेल्या कंपनीत चांगले पद मिळण्याची संधी आहे. त्याच प्रमाणे इतर कंपन्यांचे पर्यायदेखील त्याच्याकडे होते. त्याचा सुरुवातीचा पगारच त्याने केलेली गुंतवणूक योग्य असल्याचे दर्शवतो. म्हणून मी त्याला कोणताही संकोच न करता कर्जाविषयी वडिलांशी बोलण्याचा सल्ला दिला.
प्रसन्नाचे प्रकरण काहीसे वेगळे होते. त्याच्या मुलाचे उत्पन्न वाढल्यामुळे शैक्षणिक कर्ज घेणे योग्य ठरते यात कोणतीही शंका नाही; पण एक प्रश्न उपस्थित होतो की त्याचा दुसरा मुलगा भारतात परत येईल काय? तो परतला नाही तरी तेथे राहून कर्ज भागवेल काय? प्रसन्नाकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नव्हते. मुलाने कर्जफेड न केल्यास त्याच्या घराला धोका निर्माण झाला असता, तर दुसरीकडे एक जबाबदार पालकाच्या नात्याने मुलाने उच्चशिक्षण घ्यावे, अशी प्रसन्नाची इच्छा होती; पण त्याचा मुलगा विदेशात राहिला तर कायदेशीररीत्या कर्ज फेडण्याची जबाबदारी आईवडिलांवर येते. परिणामी बँक त्याच्या घरावर जप्ती आणू शकते. मी प्रसन्नाला हा सल्ला दिला की, त्याच्या सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून कर्ज फेडणे किती गरजेचे आहे, हे मुलाला पटवून द्यावे आणि नंतरच कर्ज घेण्याचा विचार करावा.
या गोष्टी लक्षात ठेवा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.