आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला तुमच्या चुकांची पुनरावृत्ती करायची आहे का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुकांवर खूप वेळ पश्चात्ताप करणेही एक चूक आहे. चुकांमधून धडा घ्या. त्यांच्याविषयी विचार करून दु:खी होऊ नका. तीच चूक पुन्हा न करण्याचे वचन स्वत:ला द्या. हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने याविषयी सांगितले आहे.

हावभावांतून संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा - एखाद्या व्यक्तीशी बोलताना हावभाव, उठण्या-बसण्याच्या पद्धतीकडे म्हणजेच बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्या. त्यातून बोलणे लवकर समजते. अनेकदा लोकांना बॉडी लँग्वेज समजत नाही. एखाद्या मीटिंगमध्ये सहभागी होण्यापूर्वी स्वत:ला दोन प्रश्न विचारा. पहिला- तुम्ही खुर्चीवर चुपचाप बसून असाल तर ठीक आहे, पण तुम्ही खुर्ची फिरवत असाल, टेबलवर बोटांनी रेषा काढत असाल किंवा वारंवार फोन पाहत असाल तर समोरील व्यक्तीला वाटेल की, तुमचे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नाही. दुसरा- वादविवादादरम्यान काही लोक वारंवार मध्येच बोलतात. तुम्हीही मध्येच बोलण्याचा प्रयत्न करत असाल. पुढे येण्याचा प्रयत्न करत असाल. त्यामुळे इतरांना वाटेल की, तुम्ही त्यांचे मत ऐकण्याऐवजी फक्त स्वत:ची बाजू मांडण्यासाठी आग्रह धरत आहात.

नेटवर्किंग साइटवर स्वत:चे ध्येय सांगा.. - तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा नसाल, पण डिजिटायझेशनमुळे कंपन्यांची नजर तुमच्यावरच असते. तुम्ही तीन डिजिटल पद्धतींनी स्वत:विषयी माहिती देऊ शकता..
* तुमचे ध्येय आणि क्वालिफिकेशन इंजिनिअरिंगमध्ये असेल तर फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्किंग साइटवर ही माहिती द्या. फक्त आवडते पदार्थ किंवा प्राण्यांविषयी वाटणारे प्रेम व्यक्त करू नका.
* नेटवर्किंग साइटवर तुमचे पूर्ण नाव म्हणजे नाव आणि आडनाव टाका. आयडीमध्ये नाव वापरा. त्यामुळे कंपन्यांना तुमच्याशी संपर्क साधणे सोपे जाईल. कमी वेळात तुमच्याविषयी त्या माहिती गोळा करू शकतील.
* स्पेशालिटीवर लक्ष केंद्रित करणारे फोरम, कम्युनिटी किंवा ग्रुपच्या संपर्कात राहा. त्यात तुम्हाला सक्रिय सहभाग घेण्याची गरज नाही, पण कधी कधी योगदान दिल्याने चांगली प्रतिमा बनते. लोक तुम्हाला एखादा नेता असल्यासारखे मानतात.

वेगवेगळ्या पद्धतींनी काम करा
यश मिळवण्यासाठी सेल्फ-एस्टीम (स्वाभिमान) आवश्यक आहे. पण हाय सेल्फ एस्टीम धोकादायक असतो. स्वत:ला महान समजण्यासाठी तुम्हाला आधी स्वत:च्या नजरेत महान ठरावे लागेल. म्हणजेच स्वत:च्या प्रतिमेसोबत जगावे लागेल. असे न केल्यास तुम्ही चुकीच्या भीतीतच वावरत असता. एवढेच नाही तर चूक झाल्यावर तुम्हाला सर्व काही नष्ट झाल्याची जाणीव होईल. आव्हाने पेलण्यासाठी समजूतदार किंवा पात्र असणे आवश्यक नाही, पण अशा वेळी आपल्यातील वाईट गोष्टी लक्षात ठेवा. चुका पश्चात्तापासह नव्हे, तर समजूतदारपणे स्वीकारा. आपल्यातील पात्रता योग्यपणे पारखून पाहिल्यास पुढच्या वेळी एखादे काम कोणत्या पद्धतीने करायचे हे तुमच्या लक्षात येईल. यश मिळवण्यासाठी परफेक्ट असणेही आवश्यक नाही, पण एकच चूक दोनपेक्षा जास्त वेळा केल्यास निश्चितच अपयश हाती येईल.

सादरीकरणात गॅप आणि ताणाचा फायदा होतो...
चांगले सादरीकरण एखाद्या कथेसारखे असते. दोहोंमध्ये एखाद्या मुद्द्यावर चर्चा करून उपाय शोधला जाऊ शकतो. प्रेक्षक किंवा श्रोते समजू शकतील अशा गोष्टींपासून सादरीकरणाला सुरुवात करा. आपले मत मांडल्यानंतर प्रेक्षक किंवा श्रोते तुमच्याशी सहमत आहेत की नाही हे पाहा. त्यामुळे प्रेक्षकांशी नाते जुळणे सोपे जाईल. ते तुमचे विचार ऐकण्यासाठी उत्सुकता दाखवतील. स्वत:ची भूमिका निश्चित करून आपले विचार समोर ठेवा. प्रेक्षक आणि स्वत:मध्ये थोडे अंतर ठेवा. तणावाचे वातावरण निर्माण करा. यातून चांगले परिणाम मिळू शकतात. नंतर तणाव कमी करण्याचे प्रयत्न करा. यामुळे प्रेक्षक तुमच्या बोलण्याशी खिळून राहतात. तसेच तुमचे म्हणणे मान्य करण्याचा प्रयत्नही करतात आणि अखेर तुमच्याशी सहमत होतात.