आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय घ्यायला विलंब न लावता जोखीम घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीडर्सने संस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणा-यांना काही गोष्टी विचारत गेले पाहिजे. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. आपल्याकडे खूप संधी असतील तर त्यातील काहींना नको म्हणायलाही शिका. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून यासंदर्भातील टिप्स वाचा...
टिप्स
* प्रश्न विचारून विश्वास संपादन करा
एखादे उत्तर मिळवण्यासाठी कर्मचा-यांकडून इनपूट किंवा मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता नाही, यावर अनेक नवे लीडर्स विश्वास ठेवायला लागतात. मात्र, मुख्य कर्मचा-यांसोबत विश्वासाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करण्यास प्रत्येक नव्या लीडरने प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. संस्थेत योगदान देणा-या अशा अनेक कर्मचा-यांमध्ये जेवढे मिसळता येईल तेवढे मिसळले पाहिजे. त्यांना सामान्य परंतु प्रभावी प्रश्न विचारा-‘उद्या तुम्हाला माझी जबाबदारी दिल्यास असे पहिल्यांदा कोणती तीन कामे कराल आणि का?’ ‘आपल्या यशात सर्वात तीन प्रमुख अडचणी कोणत्या?’‘ आणि तुमच्यासाठी तीन सर्वात मोठ्या संधी कोणत्या आहेत?’ त्यांचे यावर उत्तर ऐका आणि ते लिहून घ्या. लक्षपूर्वक ऐकल्यानंतर आपल्या योग्यतेचा आदर केला जात असल्याचा संदेश कर्मचा-यांमध्ये जाईल. (स्रोत : द बेस्ट वे फॉर न्यू लीडर्स टू बिल्ड ट्रस्ट- जिम होहेर्टी)
* प्रोजेक्टच्या आढावा घ्या, सुधारणा होईल
अनेक प्रोजेक्ट्स वेळ आणि आर्थिक तरतुदीवर यशस्वी होतात. हे फॅक्टर्स महत्त्वपूर्ण आहेत, मात्र एकट्या या गोष्टींची मदत तुमच्या बिझनेस वाढीसाठी होणार नाही. मोठ्या प्रोजेक्ट्सवर पुढील दृष्टिकोन अंगीकारू शकता. प्रथम- बिझनेस केसचा नियमितपणे आढावा घेत राहा, त्यात सुधारणा करा. बाजारात चढउतारासाठी ते आवश्यक आहे. तुम्ही जे काम करता, त्याचा आढावा घेत चला. त्यातील छुप्या अडचणी जाणा त्यामुळे प्रोजेक्टच्या यशप्राप्तीसाठी मदत होईल. दुसरे- प्रोजेक्ट मॅनेजर कष्टाळू असावा. प्रोजेक्टच्या यशाचा तो पहिला आधारस्तंभ असावा. प्रोजेक्टशी संबंधित लोकांच्या समस्या समजणार, जोखीम उचलणारा मॅनेजर असावा. आवश्यकता पडल्यास त्याने बदलासाठी तयार राहावे. निमूटपणे प्रोसेस स्वीकारण्याऐवजी तो निर्णय घेणारा असावा. बदलत्या वातावरणात ताळमेळ बसवण्यासाठी स्ट्रॅटेजिक थिंकर असायला हवा.
(द हिडन इंडिकेटर्स ऑफ ए फेलिंग प्रोजेक्ट - ग्रेटचेन गेवेट)
* पन्नाशी ओलांडली असेल तर हे जरूर करा
करिअरमध्ये वाढत्या वयासोबत आपल्या व्यवसायात अपडेट राहणे आवश्यक आहे. त्यासाठी कायम तत्पर असले पाहिजे. 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यावसायिकांनी या टिप्सवर काम केले पाहिजे. पहिले- ओव्हरक्वॉलिफाइड असाल तर त्याचा स्वीकार करा. कोणत्याही प्रसंगापासून पळून जाऊ नका. त्याचे नेतृत्व करा. मॅनेजर असतानादेखील तुमच्या मालकासमोर येणारा दबाव आणि ताण समजून घ्या. यातून तुम्ही एक चांगले कर्मचारी सिद्ध होऊ शकता. दुसरे- तुम्ही ट्विटर किंवा लिंक्डइनवर नसाल तर तुमच्याकडे दुर्लक्ष होईल. सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने तुम्हाला आपल्या व्यवसायामध्ये कायम राहण्यास मदत मिळू शकते. तिसरे, वास्तवाशी जोडले जा. तुमचा ज्यांच्याशी संपर्क तुटला आहे त्या लोकांना सर्वाधिक चांगल्या व्यावसायिक संधी मिळतात. जुने संपर्क संपुष्टात आल्यानंतर नव्या लोकांशी जोडले जा. नवे ज्ञान प्राप्त करा. काम आणि अनुभवामुळे तुम्हाला जुन्या लोकांशी जोडण्यास मदत मिळेल.
(स्रोत : हाऊ टू रिइन्व्हेंस्ट योरसेल्फ आफ्टर 50- डोरी क्लार्क)
टॉकिंग पॉइंट्स
* अति परिश्रम; तब्येतीवर परिणाम
दररोज जास्त परिश्रम घेणारे आणि अकॅडमिकमध्ये अधिक यशस्वी ठरलेलेल्या अमेरिकेतील 19 वर्षाच्या वयाच्या तरुणांना निरोगीपणा कमी आढळून आला. आक्रमक, चिडचिड करणारे व एकटे-एकटे राहणारे याच वयाचे तरुण जास्त निरोगी दिसून आले. नॉर्थवेस्टर्ग युनिव्हर्सिटीच्या ग्रेगरी ई. मिलन यांच्या संशोधनानुसार कमी उत्पन्नाच्या पार्श्वभूमीमुळे त्यांच्या यशावर अंतर्गत दबाव जास्त होता, मात्र जास्त परिश्रम केल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर विपरित परिणाम झाल्याचे या संशोधनात आढळून आले आहे.(स्रोत : द न्यूयॉर्क टाइम्स)
* उत्साहीपणाची नव्हे, तर नैतिक चारित्र्याची छाप पडेल
तुमचे नैतिक चारित्र्याची उंची कितपत आहे, यावर तुम्हाला भेटायला येणा-यावर त्याची छाप पडते. तुम्ही किती उत्साहात त्यांना भेटता याला फारसे महत्त्व नसते. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हिनियाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात की वाईट हे लोक आधी पाहतात.
(स्रोत : अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन)
* ध्यान केल्यास सहजपणे निर्णय घेणे होते शक्य
जे लोक ध्यानधारणा करतात ते व्यवसायाशी संबंधित निर्णय सहज घेऊ शकतात. फ्रान्समध्ये इनसीएड स्कूलच्या अँड्र्यू सी. हेफनब्रेक आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनात जे लोक दररोज 15 मिनिटांपर्यंत ध्यान करतात, ते ध्यान न करणा-यांच्या तुलनेत 77 टक्के जास्त वेगाने निर्णय घेतात. ध्यानामुळे मेंदू मोकळा होतो, चांगले निर्णय निघतात.
(स्रोत : सायकॉलॉजिकल सायन्स)