आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीवरील संकट कर्मचा-यांपासून लपवू नये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर आरामात राहून ते मिळवणे शक्य नाही. तणाव आणि थकव्यापासून बचावासाठी दैनंदिन कामे नियमितपणे केली जाणे गरजेचे आहे. त्यात ई-मेल्सचेही नियोजन आवश्यक असते. वाचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधील अशाच काही टिप्स...


आरामाच्या मानसिकतेतून बाहेर या!
कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी आरामाच्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे असते. यासाठी मोठे धाडस करण्याची गरज असते. असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुम्ही क्षमता आणि गुणवत्ता विकसित कराल. यासाठी पुढील पद्धतींचा अवलंब आपण करू शकतो. पहिली पद्धत - स्वत:ला कसे प्रेरित करू शकता ते ओळखा, नेटवर्किंग
किंवा लोकांमध्ये बोलताना तुमचे वर्तन महत्त्वपूर्ण असते, ते तुम्हाला करिअरमध्ये पुढे नेऊ शकते किंवा इतर ध्येय गाठण्यात मदत करू शकते. दुसरी पद्धत - कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष नियोजन करा. उदाहरणार्थ तुम्ही अंतर्मुख व्यक्ती असाल आणि नेटवर्किंग इव्हेंटस्ची तुम्हाला भीती वाटत असेल, अशा वेळी काही
लोकांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करा, या सुरुवातीच्या भेटीगाठींचा हेतू हाच ठेवा की, पुढे तुम्हाला लोकांशी बोलण्यात अवघडलेपणा वाटू नये.
(स्रोत : गेट आऊट ऑफ युवर कंफर्ट झोन, अ गाइड फॉर द टेरिफाइड-एंडी मोलिंस्की)


कंपनी संकटात असेल तर हे करा
कोणत्याही कंपनीचे भविष्य सुरक्षित नाही. जर तुमच्या कंपनीची विक्री कमी होत आहे, ती विकण्याची वेळ आलेली आहे किंवा बंद पडण्याच्या स्थितीत आहे. अशा वेळी आपल्या भवितव्याबद्दल चिंतित असलेल्या कर्मचा-यांना कसे समजवावे? जर आपली संस्था अडचणीत असेल तरी तुम्ही आपल्या कर्मचा-यांना ध्येयावर लक्ष केंद्रित करणे व ठोस निकालासाठी काम करण्याबद्दल प्रेरित करू शकता. शक्य तेवढे प्रामाणिक राहून जे आपणास माहीत आहे त्याची कर्मचा-यांना जाणीव करून द्या. कर्मचा-यांना सत्य परिस्थिती सांगा. याकडे दुर्लक्ष करून लोकांना अंधारात ठेवू नका. कठीण परिस्थितीत त्यांना खोट्या अन् अप्रामाणिक गोष्टींपासून सावध करीत राहा. कोणत्याही परिस्थितीत लोक आपल्या कामाशी संबंधित बाबींवरच विश्वास ठेवत असतात. त्यामुळे जेव्हा कंपनीचे यश हे लक्ष्य उरत नाही तेव्हा अशा गोष्टी तुम्ही ओळखू शकता. ज्यांचे कर्मचा-यांना वैयक्तिक पातळीवर महत्त्व वाटत असते.
(स्रोत : मॅनेजिंग पीपल अॉन ए सिकिंग शिप-एमी गॅलो)


कामाची जागा निवडण्याची मुभा द्या
संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, कामाची जागा निवडण्याने कर्मचारी केवळ खुशच राहत नाहीत तर त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढते. कर्मचा-यांनी स्वत:च जागेचे नियोजन केले, तर कंपनीच्या प्रोजेक्टला मदतच होते. टेबल गोल असो अगर लांबट, पण त्यामुळे कर्मचा-यांना उत्पादन साखळी नियंत्रित करण्यास मदत होणे गरजेचे आहे. याबाबत विचार करा की, आपली संस्था कर्मचा-यांना कोणती जागा उपलब्ध करून देऊ शकते, ज्यामुळे ते आपले कॉर्पोरेट लक्ष्य गाठण्यासाठी आगेकूच करू शकतील.
(स्रोत : एम्प्लॉइज परफॉर्म बेटर व्हेन दे कॅन
कंट्रोल देअर स्पेस-डायने हॉस्किन्स)


मानसिक ऊर्जा वाढीसाठी
दैनंदिनी निश्चित करा

प्रत्येक वेळी तुम्ही निर्णय घेत असता, त्यामुळे तुम्हाला तणाव व थकवा येत असतो. त्यामुळे निर्णयांची संख्या कमी करण्याची सवय लावा, एखादे काम दररोज करावयाचे असेल तर ते तुम्ही ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याची सवय लावा. उदाहरणार्थ पूजा, प्रार्थना यांची वेळ ठरलेली
असावी. तसेच आपल्याला आलेल्या ई-मेल्स, व्हॉइस मेल्स चेक करणे व त्यांची उत्तरे देण्याची वेळ निश्चित असावी, त्यामुळे महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला सुविधा होऊ शकते. कमी महत्त्वाची कामे काही काळ बाजूला ठेवल्याने महत्त्वाच्या कामांसाठी अधिक ऊर्जा शिल्लक राहते.
(स्रोत : एचबीआर गाइड टू मॅनेजिंग स्ट्रेस अ‍ॅट वर्क)


ई-मेल्स चेकिंगसाठी नियम निश्चित करा
काही विशेष प्रकारचे ई-मेल्स कसे हाताळावे, याचेही काही नियम आहेत. प्रत्येक नियमाचे दोन भाग आहेत, विभागणी आणि कृती नियमांमुळे ई-मेल्सच्या क्षमतेवर नाट्यमय प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ सगळ्या शेड्युल्ड रिक्वेस्ट, मीटिंगची निमंत्रणे, त्यांची स्वीकृती एकाच फोल्डरमध्ये ठेवण्याचे ठरवा व गरजेनुसार दिवसातून एक किंवा दोन वेळा त्याचे अवलोकन करा. अपवादात्मकरीत्या तुम्ही ते लिहूही शकता. त्यामुळे जो कुणी तुम्हाला मेल पाठवेल तो तसा मार्क करून पाठवेल.
(स्रोत : वर्क स्मार्टर, रूल युवर ई-मेल- अलेक्झांड्रा)