आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ कर्मचार्‍यांना दीर्घकाळ कंपनीत टिकवण्याच्या पद्धती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या कामाची स्तुती व्हावी, असे वाटत असेल तर आपणही इतरांच्या कामाची प्रशंसा करणे आवश्यक असते. जुने कर्मचारी कंपनीत टिकवून ठेवण्याच्या काही पद्धती या सदरात दिल्या आहेत. याविषयी व उत्कृष्ट काम करण्यासाठीच्या टिप्स... हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून..
ऑफिसमध्ये इतरांचे कौतुक करणेही आवश्यक
प्रत्येक जण श्रेय लाटण्यासाठी पुढे असतो. फक्त स्वत:चे काम दाखवून कौतुकाची थाप मिळवण्याच्या नादात अनेक जण टीमचे योगदान विसरून जातात. सकारात्मक वृत्तीने हा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा. इतरांचीही स्तुती करण्याची सवय लावा. एखाद्याची स्तुती आपण का करत आहोत, याचे कारणही सविस्तर सांगा. या बदल्यात समोरील व्यक्तीही आपल्या कामाचे कौतुक करेल. या वातावरणामुळे सगळेच जण उत्साहाने काम करतील. आपल्या कामाची स्तुती होत नसेल किंवा आपली ओळख निर्माण होत नसेल तर काम करणे कठीण होते. त्यामुळेच सतत इतरांची प्रशंसा करत राहा.
(स्रोत : इफ यू आर फीलिंग अनअ‍ॅप्रिसिएटेड, गिव्ह समवन एल्स द क्रेडिट-जोश)

कर्मचार्‍यांना प्रेरणा देण्यासाठी मोठी संधी शोधा
वरिष्ठ व्यवस्थापक किंवा स्टाफमधील सदस्यांना कॉर्पोरेट धोरण समजावून सांगणे कठीण वाटू शकते. इतरांनी सांगितलेले किंवा समजावून सांगितलेले ग्रहण करण्याची क्षमता बहुतांश लोकांकडे नसते. त्यामुळे ते समजावून सांगण्याऐवजी मोठ्या संधीची वाट पाहा. त्याविषयी सांगा. त्यामुळे भविष्याविषयी जाणून घेणे तसेच सदस्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. ही पद्धत दीर्घकाळ प्रभावी ठरू शकते. मोठी संधी लिखित स्वरूपात सांगणेही फायद्याचे ठरेल. लहान मजकूर, सरळ पद्धतीने लिहिल्यास प्रभावी ठरेल. वरिष्ठ सदस्यांचाही यावर विश्वास असणे आवश्यक आहे.
(स्रोत : फरगेट द स्ट्रॅटेजी पॉवर पॉइंट : जॉन पी. कॉटर)

वरिष्ठ कर्मचार्‍यांना काम करणे सोपे जाण्यासाठी उत्कृष्ट सुविधा देणे गरजेचे
कॉर्पोरेट वर्कफोर्स वृद्धापकाळाकडे झुकत आहे. अनेक कंपन्यांनी वरिष्ठ कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीही पुढील काही उपाय करून वृद्ध-वरिष्ठ कर्मचारी टिकवून ठेवू शकता. पहिला उपाय : लवचिक सेवानिवृत्ती. या कर्मचार्‍यांना अर्धवेळ काम करण्याची सुविधा द्या. लवचिक वेळा व पे चेक देता येतील. दुसरा- नवे पद निर्माण करा किंवा जुन्याच पदावर ठेवा. त्यांच्या कौशल्यानुसार एखादे मोठे काम द्या. त्यातून त्यांच्या गरजाही भागल्या पाहिजेत. उदा. एखादा कर्मचारी दीर्घकाळ कॅशियर असल्यास कस्टमर केअर विभागात त्याला स्थान देता येईल. त्यामुळे त्याला काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. तिसरा- या कर्मचार्‍यांची मदत करण्याचा प्रयत्न करा. उदा. ईझी-टू-रीड स्क्रीन किंवा इतर सुविधा देता येतील. अशा प्रकारचे उपाय केल्यास काम करणे सोपे जाईल.
(स्रोत : फ्यू वेज टू अ‍ॅडॉप्ट टू अ‍ॅन एजिंग वर्कफोर्स- मायकल नॉर्थ व हॉल हेशरफील्ड)

टीमचा विचार करणे हे उत्कृष्ट सीईओचे वैशिष्ट्य
सीईओ अर्थात प्रमुख कार्यकारी अधिकार्‍याला नेहमीच कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन करायचा असतो. त्यामुळे झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे. कर्मचार्‍यांचा विचार करणे, महत्त्वाचे काम करणे व कर्मचार्‍यांच्या फायद्याचा विचार केल्यासच कार्यकारी अधिकार्‍यातील कौशल्ये अधिक स्पष्ट होतील. आर्थिक घडी विस्कटल्यावर कर्मचार्‍यांना काढून टाकणे किंवा वरिष्ठांना प्रमोशन देणे म्हणजे सुरक्षितता नव्हे. जे सीईओ जोखीम पत्करतात किंवा अधिक मेहनत करतात त्यांच्यासाठीच कर्मचारी अधिक काम करतात.
(स्रोत: फोर वेज ऑफ बीइंग ट्रस्टेड लीडर्स- जॉन डेम)

फीडबॅकमुळे दर्जा सुधारेल व सकारात्मक परिणामही दिसतील
आपली टीम योग्य वेळी आणि योग्य बजेटमध्ये काम करत आहे की नाही हे फीडबॅकवरून कळते. चांगल्या कामाची स्तुती होईल असे व खराब काम करणार्‍या अशा दोन प्रकारच्या कर्मचार्‍यांची यादी करा. प्रत्येक जण परस्परांना फीडबॅक देऊ लागल्यास आपलेपणाची भावना निर्माण होते. जे फीडबॅक देत नाही त्यांना ही पद्धत का आवडत नाही, हे स्पष्टपणे विचारा. त्याचे कारण जाणून घेतल्यानंतर फीडबॅक संस्कृती विकसित होण्यासाठी योग्य सुधारणेचे सल्ले द्या.
(स्रोत : एचबीआर गाइड टू लीडिंग टीम्स- मॅरी शपिरो)