आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपले म्हणणे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यवस्थापक, बॉस अथवा लीडरचे टीमसोबत कसे वर्तन असावे, याबाबतच्या टिप्स हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये दिल्या जातात. यात कामकाजाच्या पद्धतींसोबतच चमूची संभ्रमावस्था दूर करण्याविषयीसुद्धा मार्गदर्शन केले जाते. जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती...

टिप-1
प्रेझेंटेशन नंतर फक्त दृष्यमानच लक्षात राहत असते. त्यावर परिणाम दीर्घकाळ राहण्यासाठी त्यास संकलित रूप द्यावे. यासाठी ग्राफिक्स किंवा चिन्हांचा वापर करता येते. वाक्य पूर्ण लिहिण्यापेक्षा फक्त की-वर्डचा वापर करावा. क्रमांकांऐवेजी ठळक मुद्दे प्रभावी ठरतील. एकाच संकल्पनेवर कायम राहत प्रत्येक स्लाइडवर सहा ओळींपेक्षा अधिक लिहू नका. फ्लिप चार्ट किंवा व्हाइट बोर्ड डिस्प्लेवर फक्त ३ ते ६ कल्पना मांडा. सर्व दृश्यांमुळे प्रेझेंटेशन आकर्षक होईल, याकडे लक्ष द्यावे. जास्तीच्या स्लाइड रटाळवाण्या वाटतात. फ्लो चार्टमध्ये खूप सारे बॉक्सेस, बाण, फीडबॅक लूप किंवा मजकूर यांच्यासारख्या संभ्रम तयार करणार्‍या दृश्यमानांमुळे प्रेक्षकांचा रस कमी होऊ लागतो. शिवाय, दृश्यांसोबत भरपूर मजकूर लिहिण्याने किंवा तो मजकूर मोठमोठ्याने ऐकण्यानेही प्रेझेंटेशन देणार्‍यात आणि प्रेक्षकांत दुरावा येऊ शकतो.
(स्रोत- प्रेझेंटेशन फ्रॉम २० मिनिट मॅनेजर सिरीज)

टिप-2
सर्व ग्राहक योग्यच असतात असे नाही. अनेकदा ग्राहक कर्मचार्‍यांच्या आत्मविश्वासाला तडा पोहोचवून त्यांच्या प्रतिष्ठेसाठी धोक्याचे व अडचणींचेही ठरतात. त्यामुळे ग्राहकाची चांगले किंवा वाईट अशी विभागणी करणे कठीण जाते. त्यासाठी कोणत्या ग्राहकांना नेमकी कशी वागणूक द्यायची, याविषयी कर्मचार्‍यांना शिकवले पाहिजे. हे कर्मचारी कंपनीच्या फ्रंटलाइनशी जोडले गेले पाहिजे. कारण, कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना वेळ दिल्यास कंपनीचा फायदा होईल आणि कोणत्या ग्राहकांपासून कंपनीला फायदा होऊ शकत नाही, हे फक्त त्याच कर्मचार्‍यांना माहीत असते. बहुतांश कंपन्या या विषयावर त्यांचा कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे देण्याचे टाळते. कारण त्यांच्यासाठी ग्राहक हेच सर्वोच्च असते. ते सर्व प्रकारच्या ग्राहकांशी संबंध जोडू इच्छितात. मात्र, तत्काळ चांगला निर्णय कसा घ्यावा, हे कर्मचार्‍यास प्रशिक्षण दिल्यानेच कंपनीला कळू शकते.
(स्रोत- व्हेन अँड व्हाय टू पार्ट व्हेज विथ अ कस्टमर बाय लियोर आरुसी)

टिप-3
वेळे अभावी बहुतांश व्यवस्थापक योग्य प्रतिसाद देण्याचे टाळतात. त्यासाठी, कर्मचारी व व्यवस्थापकांसाठी प्रतिसाद प्रक्रिया सुलभ बनवण्याच्या टिप्स जाणून घ्या. पहिला मुद्दा, जास्त बोलू नका. प्रतिसाद द्यायचे असेल, तर थेट मुख्य मुद्द्यास हात घाला. असे केल्याने आपल्याला काय सांगायचे आहे हे टीमला कळेल आणि ते त्याच पद्धतीने व्यक्त होतील. दुसरा मुद्दा म्हणजे, कर्मचार्‍यांना संभ्रमात टाकण्यापेक्षा थेट बोला. "थिंक अबाउट' किंवा "मेबी यू कॅन' यांसारख्या शब्दांत गुंतवण्यापेक्षा थेट वास्तविकता सांगा. आपण जसा विचार करतोय तसेच त्यांच्यासमोर व्यक्त व्हा. तिसरा मुद्दा म्हणजे निरर्थक विषयांवर चर्चा किंवा वारंवार एकाच प्रकारच्या गोष्टीवर सतत बोलत राहण्यापेक्षा त्यांना कोणत्या गोष्टी बदलण्याची गरज आहे किंवा त्यांचे पुढचे नियोजन काय असेल, हे कर्मचार्‍यास पटवून द्या. यामुळे एकाच विषयावर सतत चर्चा होणार नाही आणि कर्मचार्‍यासही संभ्रम होणार नाही. (स्रोत- गिव्हिंग इफेक्टिव्ह फीडबॅक व्हेन यू आर शॉर्ट ऑन टाइम बाय डेझी)
बातम्या आणखी आहेत...