आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक विचारांनी मिळेल सहज यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नकारात्मक अाणि सकारात्मक गोष्टी प्रत्येक ठिकाणी होतात, परंतु तोच यशस्वी होतो ज्याचे लक्ष सकारात्मक गोष्टींवर राहते. जर तुम्हाला व्यवस्थापकाच्या भूमिकेत ठेवले तर स्वत:चे तत्त्वज्ञान बनवा. यासंबंधी टिप्स वाचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूतून....
सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या, तणाव होईल कमी
कार्यालयात सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी असतात. पण लोकांचे लक्ष नेहमीच नकारात्मक गोष्टींवर जाते. परंतु संशोधनानुसार कार्यालयात एखादी सकारात्मक छोटी गोष्टदेखील तणाव कमी करण्यास लाभदायक ठरते. जेव्हा लोक विचार करतात की, दिवसभरात त्यांच्या बाबतीत काय चांगले आणि वेगळे झाले. तेव्हा त्यांचा तणाव कमी होऊ लागतो. असे केल्याने त्यांना नकारात्मकतेपासून दूर राहणे सोपे जाते. काही लोकांसाठी सकारात्मक विचार करणे नैसर्गिक प्रक्रिया असते. परंतु, बरेच लोक नकारात्मक गोष्टींवर अधिक फोकस ठेवतात.त्यामुळे त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणे कठीण जाते. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित केल्यास जीवनात हमखास लाभ मिळेल.
(स्रोत: द पाॅवरफुल इफेक्ट ऑफ नोटिसिंग गुड थिंग्ज अॅट वर्क बाय जोयसे अँड थेरेसा)

व्यवस्थापकांनी बनवावी स्वत:ची लीडरशिप फिलोसॉफी
नवीन व्यवस्थापक नेहमी जुन्या व्यवस्थापकापेक्षा वेगळा असतो. तुम्ही एखादे भांडण सोडवत असाल, कठीण संदेश देत असाल अथवा कामगिरीबद्दल बोलत असाल, या सर्व बाबतीत यश मिळवण्यासाठी क्लिअर मॅनेजमेंट फिलोसॉफी फायदेशीर आहे. यात सेवक लीडरशिप चांगले उदाहरण आहे. व्यवस्थापकाने एका सेवकाप्रमाणे विचार करायला हवा. टीम त्यांच्यासाठी काम करते हे त्यांना कधीही जाणवायला नकाे. कारण ते तुमच्यासाठी काम करीत नाहीत. पूर्ण टीम कंपनीसाठी काम करते आणि तुम्ही फक्त मध्यस्थीची भूमिका पार पाडता. याकरिता पर्सनल ग्लोरीवर लक्ष देण्यापेक्षा चांगले काम करण्यावर फोकस करायला हवा. असा विचार करा की टीमची मदत कशी केली जाऊ शकते की ज्यातून सफलता मिळेल. एखाद्या व्यक्तीला काम सोपवण्यापूर्वी ते काम त्या कर्मचाऱ्याच्या आवडीचे आहे की नाही, फीडबॅक देतेवेळी पाहा कर्मचाऱ्यासाठी बेस्ट जॉब ऑप्शन काय आहे. या पद्धतीने चांगले प्रदर्शन करू शकता.
(स्रोत: न्यू मॅनेजर्स नीड अ फिलोसाॅफी अबाउट हाऊ दे विल लीड)

सादरीकरणाची आठवण राहावी यासाठी वापरा या पद्धती
चांगल्या प्रेझेंटेशनचा अर्थ स्ट्रक्चर आणि स्टाइलवर फोकस असून काही गोष्टींची यात खूप आवश्यकता आहे. ती अशी की प्रेक्षकांना तुमच्या गोष्टी खूप काळापर्यंत स्मरणात राहतील. यासाठी या काही पद्धती फायेदशीर ठरू शकतात. पहिले, योग्य सिक्वेन्स फॉलो करा. प्रेक्षकांना सुरुवात आणि शेवट आठवणीत राहतो, याकरिता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीला अथवा शेवटी ठेवा. दुसरे- कनेक्शन बनवा. आवश्यक मुद्द्यांसाठी कनेक्शन विकसित केल्याने गोष्टी आठवणे सोपे जाते. जेवढे जास्त कनेक्शन असतील, तेवढे लोक खूप काळापर्यंत त्या गोष्टी आठवणीत ठेवतात. तिसरे- प्रेक्षकांवर काही कामे सोपवा. जेव्हा लोकांना काम करावे लागते. तेव्हा त्या गोष्टी ते आठवणीत ठेवतात. लोकांना प्रश्न विचारा, त्यांना मतदान करायला लावा.
(स्रोत: गेटिंग एन ऑडियन्स टू रिमेंबर युवर प्रेझेंटेशन )
बातम्या आणखी आहेत...