आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात काम करताना तुम्ही किती मोकळेपणाने हसता?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक शाळेत किंवा खेळाच्या मैदानावर जाताना हसण्याचा आवाज ऐकू येतो, पण ऑफिससमोरून जाताना हसण्याचा पुसटसाही आवाज येत नाही. मोठे झाल्यावर आपण हसणे विसरून जातो, असे नाही, पण ऑफिस ही साधारणपणे गंभीर जागा समजली जाते, जेणेकरून या ठिकाणी लोक एकाग्रतेने उत्कृष्ट पद्धतीने काम करू शकतील.

शास्त्रज्ञांच्या मते, ऑफिसमध्ये कामासोबतच हास्यविनोद केल्याने दीर्घकाळ काम करणे सोपे होते. ऑफिसमध्ये हसल्याने तसेच हसवल्याने दिवस छान जातो.

विविध इन्स्टिट्यूट आणि ग्रुपद्वारे केल्या जाणा-या संशोधनानुसार, ऑफिसमध्ये हसण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. उत्पादनवाढ हा त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. हसण्यावर विश्वास ठेवणारे लोक सृजनात्मक पद्धतीने समस्येतून मार्ग काढतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. अशा लोकांमध्ये तणाव कमी असतो. हसत-हसवत राहणारे लोक कामातून स्वत:च्या क्षमता दाखवून देतात.

मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा फोकस ग्रुप एका अशा निष्कर्षावर पोहोचला की, जे मॅनेजर कामासोबत हास्यविनोद करून वेळ घालवतात त्यांची कामगिरी चांगली असते. स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, दोनशेवेळा हसल्याने, दहा मिनिटे नाव चालवण्याएवढी ऊर्जा वापरली जाते. हसण्यामुळे ऊर्जा संचारते. कॉर्पोरेट थेरपिस्टच्या मते, हसण्यामुळे मूड चांगला होतो. तुम्ही इतरांसोबत काम करताना चांगले काम करता. मुंबईमधील एका सर्व्हिस कंपनीच्या सीईओने हास्यविनोदाचे कॉर्पोरेट कल्चर तयार केले आहे. त्याच्या टीममध्ये लाइट मूड असलेले लोकच काम करतात. ते ‘थॉट आणि थीम ऑफ द डे’ यासारखे उपक्रम घेत असतात. काम म्हणजे शिक्षा नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हसल्यामुळे काम चांगले होऊन उत्पादन वाढत असेल तर अवश्य हसले पाहिजे.

प्रसिद्ध विनोदी लेखक लेंड एनी जॅशवे म्हणतात की, हसण्यासाठी ऑफिसमध्ये खोडकर मार्ग वापरू नका. पुढील काही पद्धतींनी आपण ऑफिसमधील वातावरण तणावमुक्त करू शकता-
* चर्चा करताना गंभीर होऊ नका. लाइट मूड ठेवा. थोडे हास्यविनोद करा.
* कामादरम्यान आइसब्रेकर किंवा स्ट्रेस बस्टरसारखे गेम खेळा.
* मीटिंग आणि क्रिएटिव्ह सेशन आयोजित करा. यादरम्यान कर्मचा-यांना क्रिएटिव्ह चित्र-रेषा काढण्यास किंवा सृजनात्मक कामे करण्यास सांगा.
vikram.c@dainikbhaskargroup.com