आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याने जगाचे अर्थशास्त्र बिघडवले, मात्र माफीही मागितली नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

@रिचर्ड एस फुल्ड. ज्युनियर : लेहमन ब्रदर्सचे माजी सीईओ
* जन्म - 26 एप्रिल 1946
* जन्मस्थळ - न्यूयॉर्क
* शिक्षा - युनिव्हर्सिटी ऑफ कोलरॅडो
* कुटुंब - पत्नी कॅथलिन बेली, मुले जॅकलिन, क्रिसी आणि रिची.
अमेरिकेत लेहमन ब्रदर्स ही 158 वर्षे जुनी बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर संपूर्ण जगामध्ये आर्थिक भूकंप आला होता. या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी जबाबदार असणा-या रिचर्ड यांना वॉल स्ट्रीटवर ‘गोरिला’ म्हटले जाते. त्याचे आणखी एक कारण म्हणजे बँक दिवाळखोरीत निघाल्याने संपूर्ण जगाला फटका बसलेला असला तरी रिचर्ड मात्र स्वत: आनंदात आहेत. चाळीस एकर परिसरात असणा-या मोठ्या फार्महाऊसमध्ये ते राहतात. फ्लोरिडामध्ये त्यांनी एकेकाळी 840 कोटींमध्ये घेतलेले घर त्यांनी केवळ 6500 रुपयांत पत्नीच्या नावावर केले. त्यांची बहुतेक सर्व संपत्ती त्यांनी पत्नीच्या नावावर केली आहे. त्यांचा एकच नियम होता. कुटुंब सर्वात महत्त्वाचे. आशिया दौ-यादरम्यान त्यांचे सहकारी जेव्हा मनोरंजनासाठी बाहेर जायचे तेव्हा ते परत हॉटेलमध्ये जाऊन काम करायचे. लेहमनमध्ये एक किस्सा नेहमी सांगितला जातो. तो म्हणजे एका मोठ्या ग्राहकाला खुश करण्यासाठी त्या ग्राहकाची वेश्येची मागणी त्यांनी धुडकावून लावली होती. त्यामुळे नुकसानही झाले होते. आपल्या सहका-यांच्या कुटुंबावरही त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात चालावे हा त्यामागचा उद्देश असायचा. ते कधी मुलाखत देत नाहीत किंवा कधीही वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकत नाहीत. बँकेला या परिस्थितीपर्यंत आणल्यानंतरही त्यांनी पाच वर्षात कधीच माफी मागितली नाही. कारकीर्दीच्या सुरुवातीला ते पायलट होते. एका जवानाला वरिष्ठ अधिका-याने टोमणा मारल्याच्या कारणावरून त्यांनी कमांडिंग ऑफिसरबरोबर वाद घातला होता. एवढ्या स्वाभिमानी रिचर्ड यांनी बँकेसाठी 40 वर्षे खर्च केली. 1994 मध्ये बँकेचे सीईओ बनल्यानंतर सलग 14 वर्षे बँक नफ्यातही होती. 2008 मध्ये जेव्हा तोटा होताच त्यांनी दिवाळखोरीची घोषणा करण्याची तयारी सुरू केली.