आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान असो वा राष्ट्रपती ते सर्वांची मुलाखत आणायचे
०डेव्हिड पेरॉडाइन फ्रॉस्ट प्रसिद्ध पत्रकार
> जन्म : 7 एप्रिल 1939, टेंटरडेन केंट, ब्रिटन
> शिक्षण : गोनविले आणि केउस कॉलेज, केम्ब्रिज
> व्यवसाय : पत्रकार, टीव्ही निवेदक, विनोदी लेखक
> कुटुंब : पहिली पत्नी लेन फ्रेडरिकशी घटस्फोट, दुस-या लेडी केरिनाकडून तीन मुले.
पदवी प्राप्त केल्यानंतर काही दिवसांतच डेव्हिड फ्रॉस्ट यांनी 1962 मध्ये ‘दॅट वॉज द वीक दॅट वॉज’ हा उपहासात्मक कार्यक्रम सुरू केला. खूप प्रसिद्धी आणि यश मिळू लागले. त्यानंतर यूएस टीव्हीची दारे त्यांच्यासाठी उघडली. त्यांनी 100 हून अधिक बड्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. ख-या अर्थाने दबंग पत्रकार समजल्या जाणा-या या पत्रकाराने 1977 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या मुलाखतीत ते वॉटरगेट प्रकरणात सहभागी असल्याचे वदवून घेतले होते.
23 मार्च 1977 रोजी मुलाखत सुरू झाली. 12 टप्प्यांत ती घ्यायची होती. प्रत्येक आठवड्यात तीन. राजकारणाच्या इतिहासात ती सर्वाधिक पाहिली जाणारी मुलाखत होती. त्या वेळी ती 4.5 कोटी लोकांनी पाहिली होती. मुलाखतीच्या अखेरीस निक्सन यांच्या एका वाक्याने फ्रॉस्ट यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात खूप प्रसिद्धी मिळाली. ते वाक्य असे- ‘होय. मी अमेरिकी नागरिकांना खाली पाहण्यास भाग पाडले. हे शल्य आयुष्यभर मला बोचत राहील.’ यावरून निक्सन हे वॉटरगेट प्रकरणात सहभागी असल्याचे स्पष्ट होते. 90 मिनिटांच्या या मुलाखतीसाठी निक्सन यांना 6 लाख डॉलरहून अधिक पैसे द्यायचे होते. मात्र, यूएस टीव्हीने नकार दिल्यानंतर हे पैसे स्वत: फ्रॉस्ट यांनी भरले. त्यानंतर फ्रॉस्ट यांनी घेतलेल्या मुलाखतीवर एक चित्रपट तयार झाला.
1964 ते 2010 दरम्यान सर्व ब्रिटिश पंतप्रधान आणि 1969 ते 2008 पर्यंतचे सर्व अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची मुलाखत घेणारे ते एकमेव पत्रकार होते.
महिलांशी संबंध ठेवल्यामुळेही ते नेहमी चर्चेत असायचे. कधी जेनेट स्कॉटसारख्या ब्रिटिश अभिनेत्रीशी, तर कधी डायहन कॅरोलसारख्या अमेरिकन मॉडेलसोबत. ब्रिटनमधील प्रसिद्ध व्यक्ती कॅरोलीन कशिंग यांच्यासोबतही त्यांचे नाव जोडले गेले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.