आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छातीत डाव्या बाजूला जडपणा जाणवत असेल तर हृदयासह फुप्फुसाचा विकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुप्फुसे आकुंचन पावण्याची लोकांमध्ये समस्या आता पाहायला मिळते. श्वास घेताना इन्फेक्शनमुळे ही फुप्फुसे पूर्णपणे फुलत नाहीत. इन्फेक्शनच्या अपर्याप्त इलाजामुळेही असे असू शकते. इन्फेक्शमुळे पू जमतो. यामुळे फुप्फुसांवरचे आवरण मोठे बनवतो. यामुळे फुप्फुसावरचा दबाव वाढतो. टीबी आणि न्यूमोनियाचे इन्फेक्शन यासाठी जास्त जबाबदार आहे.

न्यूमोनियामुळे जे इन्फेक्शन होते त्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार झाले नाही तर छातीतील पू वाढतो. संसर्ग झालेले फुप्फुस आणि आजूबाजूने भरलेला पू यामुळे फुप्फुसे पूर्ण अंशाने फुलण्याचे सगळे प्रयत्न विफल ठरवतो. फुप्फुसात हवा घेऊन जाणार्‍या श्वासनलिकेत व्यत्यय आल्याने फुप्फुस पूर्ण अंशाने फुलत नाही. श्वासनलिकेत ट्यूमर, रक्ताची गुठळी किंवा कफाच्या कचर्‍यामुळे हा व्यत्यय येतो. अपघातामुळे जर छातीला मार लागला असेल तरीही फुप्फुसांचे नुकसान होते. जखमेमुळे छातीच्या आत रक्त जमते. यावर थोरेसिक सर्जरी हाच उपाय आहे. हे रक्त काढले नाही तर ते वाळून कडक बनते आणि फुप्फुसांवर दबाव वाढतो. यात जर इन्फेक्शन झाले तर याचा पस होतो. यामुळे फुप्फुसे संसर्गित होऊन दबावही वाढतो.

यामुळे फुप्फुसे पुन्हा कधी जुन्या स्थितीत येऊ शकत नाहीत. काही विशेष प्रकारच्या कर्करोगांमुळेही फुप्फुसे पूर्ण तºहेने प्रसरण पावत नाहीत. यामध्ये जाळीदार ट्यूमर महत्त्वाचा आहे. वैद्यकीय भाषेत याला मिजोथिनियोमा असे म्हणतात. अ‍ॅस्बेस्टॉस खनिजाच्या संपर्कात राहिल्याने हा ट्यूमर होतो. काही ट्यूमर श्वासनलिकेच्या शाख्ोत होतात. घेतलेला श्वास फुप्फुसांपर्यंत पोहोचल्यामुळे अडथळे होऊ शकतात. यामुळे हवा पूर्ण अंशाने फुप्फुसांपर्यंत पोहोचत नाहीत आणि परिणामी फुप्फुसे आकुंचन पावतात.

छातीतला पस काढण्यासाठी नळी घालून आठवडा झाला असेल तर समजा की, फुप्फुसे आकुंचन पावली आहेत असे धरून चाला. सगळे प्रयत्न आणि उपचार करूनही फुप्फुसे फुलत नसतील तर काय करावे? ताबडतोब अनुभवी थोरेसिक सर्जनचा सल्ला घ्या. मल्टी स्लाइड सीटी, टॅक्सला एमआरआय,

ब्रांकोस्कोपी, थोरेस्कोपी अशा आधुनिक पद्धतीने तपासणी करा. यामुळे योग्य उपचारांची दिशा निश्चित होईल. ऑपरेशन करण्यास उशीर करू नका. उशीर केल्यास दुसर्‍या आरोग्यदायी फुप्फुसालाही इन्फेक्शन होईल. शस्त्रक्रि येनंतर एक अत्याधुनिक आयसीयू, इंटेसिविस्ट आणि अनुभवी क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट असणे गरजेचे आहे.

आयसीयूमध्ये योग्य प्रमाणात कृत्रिम श्वास घेण्यासाठी सोय असावी. तेव्हा ऑपरेशनसाठी असे रुग्णालय निवडा, जिथे अशा प्रकारच्या सर्व सुविधा असतील. डॉक्टर किंवा रुग्णालय यांची निवड करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण आकुंचन पावलेल्या फुप्फुसांवर योग्य उपचार करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. हृदयाचे ऑपरेशन करणारास फुप्फुसांवर उपचारांची माहिती असलीच पाहिजे असे नाही.
डॉ. के. के. पांडेय,
सीनियर व्हॅस्क्युलर आणि कार्डिओ थोरेसिक सर्जन, इंद्रप्रस्थ अपोलो सर्जन, नवी दिल्ली