आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृद्धत्वावर मात : औषध व पथ्य सांभाळा, १२० वर्षे जगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पना करा की, जसे गुडघारोपणाचे शस्त्रक्रिया होते तसेच तुमच्या शरीरात जर नवे हृदय, यकृत किंवा मूत्रपिंड बसवल्यावर काय होईल? किंवा समजा तुम्ही व तुमच्या शालेय जीवनातल्या मित्रांनी ९४ वय गाठले आणि त्या जल्लोषात तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून त्यात धावत असाल तर कसे वाटेल? हे सगळं काल्पनिक वाटत असलं तरी ते वास्तवापासून फारसं दूरही नाही. वयोमान जसे वाढत जाते तसे शरीराच्या क्षमता कमी होत जातात. अवयवाच्या हालचाली मंदावत जातात. गेल्या दशकात योग्य अन्न, निवास, आरोग्यसोयी व औषधांमुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. वृद्धत्वावर मात करता येते असे सांगणारी औषधे असतात. पण माणसाचे कमाल आयुष्यमान १२० वर्ष इतके धरले गेले आहे. काही व्यक्ती या आकड्यापर्यंत मजल मारतात. आता वृद्धत्व थांबवणारी काही औषधे विज्ञानाने विकसित केली असून त्यांची शरीराला जोड मिळाल्यास आपण सहजपणे वयाची शंभरी पार करू शकतो.

मायकेल रे ही ४५ वयाची व्यक्ती रोज १९०० उष्मांक (कॅलरी) आहार घेते. मायकेलचा आहार हा शरीराला आवश्यक असणाऱ्या एकूण उष्मांकापेक्षा ६०० उष्मांकाने कमी आहे. पण मायकेल न्याहारीमध्ये सॅलड, दही व केक (मफीन्स) असा साधारण १०० उष्मांकाचा आहार घेतो व त्यातून त्याला १० टक्के पोषक द्रव्ये मिळतात. दुपारच्या जेवणात मायकेल विविध फळांचे मुरंबे व केक खातो. रात्रीच्या जेवणात तो मशरूम व थोड्या रेड वाइनचा आस्वाद घेतो. गेली १५ वर्षे मायकेल आपले कमी उष्मांकाचे (कॅलरी रिस्ट्रिक्शन – सीआर) पथ्य पाळत आला आहे. काही प्राण्यांमध्ये सीआरमुळे कर्करोग व हृदयरोगांचा धोका कमी झालेला आढळला आहे. तसेच नस-नाडींचे ठोके मंदावले आहेत व त्यामुळे आयुष्ममान वाढले आहे. कॅलिफोर्नियामध्ये ‘अँटी एजिंग फाउंडेशन’चे म्हणणे आहे की, मायकेलचे आयुष्यमान त्याच्या सिमीत पथ्यामुळे १५ वर्षे तरी वाढू शकते. मायकेलच्या आहाराची तशी खोलवर वैद्यकीय चिकित्सा झालेली नाही पण सीआर डायटमुळे १० वर्षाच्या मुलाचा जेवढा रक्तदाब असतो तेवढा तो राहतो व धमन्या काचेच्या नळ्यासारख्या स्वच्छ होतात. मायकेलला वाटते की, त्याचा सीआर त्याला त्याच्या उद्दीष्टांपर्यंत घेऊन जाईल व तो ‘अँटी एजिंग रिसर्च चॅरिटी मेथुसेलाह फाउंडेशन’चे अध्यक्ष जेव गॉबेल यांनी आखून दिलेली ‘लाँगिटिव्हीटी एस्केप व्हेलॉसिटी’ पार करेल. ‘लाँगिटिव्हीटी एस्केप व्हेलॉसिटी’ म्हणजे असा एक बिंदू की ज्या बिंदूपासून दरवर्षी आपले आयुष्य एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळाने वाढत जाते.

लॉस एंजेलिसमधील सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक एलिन क्रिमिन्स म्हणतात, हृदयरोग नाहीसा झाला तर मानवी आयुष्य पाच वर्षांनी व कर्करोग नष्ट झाला तर मानवी आयुष्य फक्त ३ वर्ष २ महिन्यांनी वाढू शकते. जसे वय वाढते तसे अनेक आजार शरीराला मारण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करू लागतात. त्यातला कोणता तरी एक आजार व्यक्तीला मरण आणतो. क्रिमिन्स पुढे म्हणतात की, जर वयाचा ९५ आकडा गाठायचा असेल तर असे काही तंत्र शोधले पाहिजे की जेणेकरून एका झटक्यात शरीरातले सर्व आजार नष्ट झाले पाहिजेत. केवळ एक-दोन आजार नष्ट करून ते काम होणार नाही.न्यूकॅसल विद्यापीठात ८५ वय असलेल्या एक हजार व्यक्तींवर चाचण्या केल्या जात आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीला किमान एक-दोन व्याधींनी हैराण केले आहे. या लोकांवर उपचार करण्यात काही कायदेशीर अडचणी आहेत. वृद्धत्व हा काही आजार नाही पण वृद्धत्व रोखण्यासाठी जी काही औषधे आहेत त्यांना सरकारकडून मंजुरी मिळणे फार अवघड आहे. ज्या काही औषधांना मंजुरी मिळाली आहे त्यामधील एक औषध मेटफॉर्मिन नावाचे असून ते मधुमेहावर उपचार करते व दुसरे औषध रेपामायसिन नावाचे असून ते अवयवरोपण शस्त्रक्रियेदरम्यान शरीराची जी हानी होते त्याला रोखण्याचे काम करते. २०१४ मध्ये मेटफॉर्मिन औषध घेणाऱ्या सुमारे ९० हजार वृद्धांची चाचणी घेण्यात आली. त्यातून असा निष्कर्ष मिळाला की त्यांचे आयुष्यमान वाढले आहे. न्यूयॉर्कमधील आइनस्टीन मेडिसिन कॉलेजमधील इन्स्टिट्यूट ऑफ अँटी एजिंग मेटमॉर्फिन या संस्थेमार्फत हे संशोधन केले जात आहे.

आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, जर नियमितपणे पथ्य पाळण्यापेक्षा औषधे खाल्यास काय परिस्थिती निर्माण घेईल? औषध कंपन्या कमी उष्मांकाच्या मफीन व सॅलडसारखे पोषण द्रव्ये असलेल्या गोळ्या तयार करतील व औषध कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होईल. मग गोळ्या पथ्यापेक्षा अधिक सोयीस्कर ठरू लागल्या तर मानवी शरीरावर त्याचे काय परिणाम होतील? शरीरातील चयापचय प्रक्रियेचे काय होईल? शरीरातील डेफ-२ हे गुणसूत्र माणसातील वृद्धत्व येण्याची प्रक्रिया मंद करते असे २० वर्षांपूर्वी आढळून आले आहे. डेफ-२ सीआरला अधिक सक्रीय करते. या गुणसूत्राबरोबर डेफ-१६ हे गुणसूत्रही काम करत असतं.

ज्या व्यक्तींचे आयुष्यमान अधिक असते त्यांच्यामध्ये डेफ -१६ गुणसूत्रांचे अंश असतात असे आढळून आले आहे. सीआरमुळे चयापचय क्रिया, पेशीविभाजन व पेशींच्या वाढीवर नियंत्रण येते व त्यामुळे शरीराची हानी कमी होते. वार्धक्यावर विजय मिळवता येऊ शकते या शक्यतेमुळे अनेकांना या विषयामध्ये रस निर्माण होऊ लागला आहे. बाल्टीमोर येथील संशोधक डॉ. झावोरोन्कोव यांनी तरुण व म्हाताऱ्या व्यक्तींमधील जीनोमचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली आहे. त्यातून ते पेशींमधील फरक सांगताहेत. वय वाढेल तसे गुणसूत्रांमध्ये बदल होतो. तसेच औषधांमधील रेण्वीय रचनेतील कोणते रेणू कोणत्या गुणसूत्रावर परिणाम करू शकतात ते डॉ. झावोरोन्कोव जगापुढे आणत आहेत. एकंदरीत हे सगळे प्रयोग होत असले तरी माणसाचे आयुष्य हे १२० वर्षांचे पुढे जाईल अशी शक्यता आज वाटत नाही.

पण अशा परिस्थितीत स्टेम सेल थेरेपीचा विचार करणे भाग पडते. केंब्रिज विद्यापीठातील संशोधक के रॉजर बार्कर यांनी पार्किंसन्स व्याधीने आजारी रुग्णाचा आजार स्टेम सेल थेरेपीने बरा केल्याचा दावा केला आहे. तर कॅलिफोर्नियात अल्झमायर रुग्णाला एका तरुणाच्या रक्तातील प्लाझमा देऊन बरे केले आहे.

फ्रेंच महिला जीन कालमेंट हिचा १२२ वय जगण्याचे रेकॉर्ड आहे. ते आजपर्यंत मोडले गेलेले नाही. अमरत्वाचा पुरस्कार करणारी ऑब्रे डे ग्रे यांचे म्हणणे आहे की, एक हजार वर्ष आयुष्य जगणाऱ्या मानवाचा जन्म झाला आहे. ग्रे यांचे हे म्हणणे ऐकायला हास्यास्पद वाटू शकते पण १८७५ साली जन्म झालेल्या कालमेटला हे माहीत नव्हतं की विषाणू,जीवाणूंमुळे आजार होतात. तिने गुणसूत्र हा शब्दही ऐकला नव्हता. १९९७ मध्ये कालमेटचे निधन झाले तेव्हा जगातला पहिला मानवी जिनोम प्रोजेक्ट तयार झाला होता. कालमेटच्या संपूर्ण जीवनकालात आधुनिक वैद्यकीय चिकित्सा विकसित होते गेली. औषधे तयार होत गेली. अशा काळात आज जन्मास आलेले एखादे बाळ कदाचित एक हजार वर्ष आयुष्य जगू शकेल.

वृद्धत्वावर मात करता येते असे सांगणारी औषधे असतात. पण माणसाचे कमाल आयुष्यमान १२० वर्ष इतके धरले गेले आहे. काही व्यक्ती या आकड्यापर्यंत मजल मारतात. आता वृद्धत्व थांबवणारी काही औषधे विज्ञानाने विकसित केली असून त्यांची शरीराला जोड मिळाल्यास आपण वयाची शंभरी पार करू शकतो.
बातम्या आणखी आहेत...