आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदृढता आणि दीर्घायुष्याचा कौटुंबिक नात्यांशी संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तज्ज्ञ हे दीर्घ काळापासून जाणताहेत की, मजबूत सामाजिक संबंध ठेवणारे दीर्घायुष्यी असतात. त्यांचे खाणे-पिणेदेखील उत्तम असते. ते व्यायामही करतात. आता त्यांनी असे होण्याचे घडण्याच्या कारणांना स्पष्टपणे समजून घेतले आहे. 
 
दीर्घायुष्याचे कारण : आपल्या वाढत्या मुलांसह राहाणे वा भावा-बहिणीसह अधिक वेळ घालवण्याची अनेक चांगली कारणे आहेत, पण त्यातील एक कारण दीर्घायु हेदेखील आहे. मजबूत आणि मधुर कौटुंबिक संबंध तसेच दीर्घ आयुष्याच्या दरम्यान स्पष्ट नात आहे. नवे संशोधन हे सांगते की, आपल्या नातेवाइकांशी कमी संबंध ठेवणाऱ्या लोकांची स्थिती या प्रकरणात कमजोर आहे. अमेरिकी सामाजिक असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत ५७ ते ८५ वर्षांच्या वयाचे ३००० लोकांवरील एक शोध अभ्यास सादर केला गेला. २०१६ च्या अभ्यासात लोकांनी आपल्या ५ जवळच्या नातेवाइकांची यादी दर्शवली आहे. ज्या ज्येष्ठांनी म्हटले की, ते आपल्या कुटुंबाच्या सदस्यांच्या फारच जवळ आहे, त्यांचा पुढील ५ वर्षांत मरण्याचा धोका ६ टक्के आहे. याच्या तुलनेत ज्या लोकांनी सांगितले की, त्यांचे आपल्या नातेवाइकांशी जवळचे संबंध नाहीत त्यांच्या मरण्याचा धोका १४ टक्के आढळला आहे.  

संशोधक विचार करताहेत की, कुटुंबाच्या प्रेरणेने निर्माण होणारी जबाबदारीच्या भावनेच्या कारणामुळे असे असू शकते. संशोधनाचे लेखक आणि टोरँटो विद्यापीठात पब्लिक हेल्थ स्कूलचे संशोधक जेम्स इवेनिउक म्हणताहेत, जवळपासचे लोक एक-दुसऱ्याकडून खूप आशा आणि जबाबदारी पार पाडण्याची अपेक्षा ठेवतात.  

भावा-बहिणींचे संबंध : उत्तम आरोग्यासाठी आपल्याला आपले भाऊ-बहीण यांचे आभारी असले पाहिजे. ज्या युवकांचे आपल्या भावा-बहिणींशी जवळचे दृढ नातेसंबंध असतात, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते. २०१५ मध्ये २४६ कुटुंबांतील भावा-बहिणींच्या संशोधन अभ्यासात असे आढळले की, ज्या युवकांचे आपल्या भावा- बहिणीशी सकारात्मक संबंध राहिलेले आहेत. त्यांच्यात निराशा-न्यूनगंडाची लक्षणे त्या लोकांच्या तुलनेत कमीच आढळली की ज्यांचे आपल्या भावा-बहिणीशी बिलकुल पटत नाही. 

इतर संशोधनातून हे कळले की, ज्या लोकांना बहीण असते, त्यांना एकटेपण जाणवणे, संकोची वा भयग्रस्त राहण्याची शक्यता कमीच असते. वयस्क भावा-बहिणींच्या शोधाभ्यासात असे आढळले की, हे फायदे अर्धवट अवस्था आणि त्याहीपुढे असते म्हणजे अर्धवट का असेना हा फायदा मिळतच राहतो. ज्या लोकांना वयस्कर भाऊ-बहीण आहे. त्यांचे अन्य स्वजनांशीही उत्तम संबंध आसतात. ते नेहमी आनंदी खुश राहतात आणि त्यांचा मूडही चांगला राहतो.
 
बोनसमध्ये मिळतात अनेक फायदे  
चांगली फिटनेस :
 २०१६ च्या एका अभ्यासात हे आढळले की, ज्यांचे  वैवाहिक जीवन सुखद आहे, ते त्या लोकांच्या तुलनेत अधिक व्यायाम करतात. त्या लोकांचे संबंध तणावपूर्ण आहेत. 

चांगले खाणे-पिणे :  संशोधनातून कळते की, जे कुटुंबासह जेवण करतात त्यांच्या खाण्यात अधिक चव असते. याने मुलांचे वजनही अनुकूल पातळीपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. प्रगती होते.

आजारपण कमी : कुटुंबातील जवळीकतेचे फायदे दिसतात. माता-पिता, मुलांमधील स्नेहपूर्ण संबंधाच्या कारणाने अनेक वर्षांनंतर कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.  
बातम्या आणखी आहेत...