आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घायुष्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्याल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्थ दीर्घायुष्यासाठी आहाराबरोबरच वर्तवणूकही चांगली असायला हवी. जो आहार आजार विशेषत: हृदयरोगापासून आपला बचाव करेल अशा आहाराला प्राथमिकता द्यायला हवी. अनेक देशांमध्ये हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. भाज्या, धान्य आणि थोडी चरबी असणारा आहार चांगला असल्याचा काही तज्ज्ञांचा समज आहे. दीर्घायुष्यासाठी आहारात प्रोटीन आणि कॅलरीचे प्रमाण कमी असायला हवे. काही तज्ज्ञ दीर्घायुष्यासाठी युरोप विशेषत: भूमध्यसागर (मेडिटेरिनियन) भागातील आहाराला योग्य समजतात. मासे, फळे, भाज्या आणि ऑलिव्हचे तेल फायदेशीर असल्याचे अनेकांचे मत आहे. २००९ मध्ये संशोधकांनी हृदयरोग झालेल्या ७४४७ रुग्णाना तीन प्रकारचे मेडिटेरेनियन आहारापैकी एक आहार दिला. ज्यांना जास्त प्रमाणात चरबीयुक्त मेडिटेरिनियन आहार देण्यात आला त्यांच्यामध्ये हृदयरोग आणि झटक्याची भीती ३० टक्क्यांनी कमी झाली.

२०१४ला अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या निष्कार्षानुसार वृद्ध शाकाहारी व्यक्तींच्या तुलनेत मांसाहार करणा-या वृद्धांचे कर्करोग आणि अन्य आजारांमुळे मरण्याचे प्रमाण जास्त होते. दक्षिण कॅलिफॉर्निया विद्यापीठातील लॉन्गेविटी इन्स्टिट्यू्टचे डायरेक्टर वाल्टेर लोंगो यांचा सल्ला आहे की, दीर्घायुष्यासाठी आहारातील प्रोटीनचे प्रमाण कमी असावे. जास्त प्रोटीनयुक्त आहार वृद्धापकाळाला निमंत्रण ठरतो. अनेक आहारतज्ज्ञांच्या मतानुसार, आपला आहार कमीत कमी असावा. सामान्यत: २५ टक्के आहार आयुर्मान वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

३० टक्के हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मेडिटेरेनियन आहार घेणा-यांमध्ये कमी होते.
25 टक्के कमी कॅलरी (सामान्य आहाराच्या तुलनेत) असलेला आहार घेतल्याने आयुष्य वाढते.