आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसासह आजारांचे पुनरागमन, असा ठेवा संतुलित आहार!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा भारतातील सुमारे 35 टक्के भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. पावसाळ्यात दमदार पावसासह आता परतीचा पाऊसही जोरदार कोसळत असल्याने काही भागांमध्ये ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या शिवाय बराच कालावधी ढगाळ वातावरण राहिल्याने लोकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे. लहान-सहान आजारांसह काही मोठे आजार फोफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्या वैद्यकीय वाऱ्या वाढल्या असून त्याची झळ आधीच महागाईच्या ओझ्याने फाटलेल्या खिशाला बसत आहे.

परतीच्या पावसासह आजारांचे पुनरागमन झाल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक झाले आहे. Prevention is better than cure असे इंग्रजीत म्हटले जाते. एखादा आजार झाल्यावर औषधे घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्याऐवजी तो आजार होऊ नये, हे उत्तम हे यातून सांगण्यात आले आहे. काळाच्या ओघात आता त्याचे महत्त्व आपल्याला पटले आहे. त्यामुळे संतुलित आहार घेण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येते. यासोबतच दररोज नियमित व्यायामही तेवढात आवश्यक आहे.

कसा असावा संतुलित आहार आणि नियमित व्यायाम... जाणून घ्या पुढील स्लाईडवर