आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Health... महाराष्ट्राचे आजारी नेतृत्व, भवितव्य सलाईनवर!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत. त्यांच्या फुफ्फुसांवर नुकतीच ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे संसदेत सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत.

आजपर्यंत महाराष्‍ट्रातील अनेक नेत्यांवर छोट्या- मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. बरेचदा प्रचार दौरा अर्ध्यावर सोडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. मात्र, डॉक्टरांचे योग्य निदान, उपचार आणि त्यांची इच्छाशक्ती या बळावर त्यांनी आजारांवर मात केली. परंतु, प्रत्येक वेळी नेते एवढे भाग्यशाली असणार का... प्रकृतीकडे त्यांनी सोईस्कर डोळेझाक करणे योग्य आहे का... जनतेच्या नजरा त्यांच्या कर्तुत्वाकडे लागल्या असताना केवळ प्रकृतीमुळे जनतेची निराशा होणे परवडण्यासारखे आहे का...

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले बहुतेक नेते साठीच्या घरात आहेत तर काहींनी साठी ओलांडलीये. सार्वजनिक जीवनातील या नेत्यांच्या कामाची आणि जेवणाची वेळ निश्चित नसते. प्रमाणापेक्षा जास्त प्रवास हा देखील त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणामकारक करत असतो. एखाद्या पक्षाची, प्रदेशाची किंवा विशिष्ट विभागाची जबाबदारी असल्याने त्यांना प्रचंड ताणतणावाला किंवा मानसिक दडपणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक नेत्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच पडत आहेत. निवडणुकीच्या काळात तर यांच्या पायाला भवराच असतो. प्रचारासाठीच्या मोजक्या दिवसांमध्ये त्यांना राज्यभर आणि राष्ट्रीय नेत्यांना देशभर भ्रमंती करावी लागते. या काळात तर त्यांना दिवस आणि रात्रही कमी पडते. प्रवासातच ते झोप आणि जेवण घेतात. याचाही त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो.

एखाद्या भागाचे राजकीय नेतृत्व तेथील भविष्य घडवित असते. महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, त्यांची प्रकृतीही तेवढीच महत्त्वाची आहे. बरेचदा क्षमता असतानाही प्रकृतीच्या कारणांमुळे माघार घ्यावी लागते, हे विसरून चालणार नाही.

असे असले तरी महाराष्ट्रातील नेते खासगीत सांगतात, की समोरची जनता आणि कार्यकर्ते हिच आमची एनर्जी आहे. या ऊर्जेच्या बळावर आम्ही कोणत्याही मोठ्या संकटावर मात करतो. आम्हाला दिवसातून २४ तास काम करण्याची प्रेरणा मिळते.

अशा नेत्यांनी संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप आणि वेळोवेळी वैद्यकिय सल्ला घेतल्यास त्यांना चांगले आरोग्य लाभू शकते, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, |महाराष्ट्रातील नेत्यांचे हेल्थ कार्ड'