Home »Divya Marathi Special» Health Milk From Aajicha Batwa

आजीबाईच्या बटव्यातून बनले पौष्टिक दूध

सुधीर उपाध्याय | Jul 03, 2011, 02:50 AM IST

  • आजीबाईच्या बटव्यातून बनले पौष्टिक दूध

रायपूर - छत्तीसगडच्या वैज्ञानिकांनी आजीच्या बटव्यातील गुणधर्म असणा-या एका नवीन पेयाची निर्मिती केली आहे. दुधापासून तयार करण्यात आलेले हे पेय लवकरच बाजारात आणले जाणार आहे. विशेष म्हणजे यांचे पेटंट मिळविण्यासाठीही या वैज्ञानिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
छत्तीसगडच्या डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेजच्या वैज्ञानिकांनी या पेयाबद्दल माहिती देताना सांगितले की, यामध्ये सर्व औषधी गुणधर्म असणा-या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वयंपाक घरातील आणि आपल्या आजीच्या बटव्यातील साहित्यच यासाठी वापरण्यात आले आहे.
सर्दी-पडशावर उपयुक्त असणारी दालचिनी, खोकला दूर पळवण्यासाठी वापरण्यात येणारी काळीमिरची, उष्णतेला दूर पळवणारी इलायची, रक्तदाब नियंत्रणात ठेवणारी खसखस यासारख्या पदार्थांचा या पेयासाठी वापर करण्यात आला आहे.
नवीन पेयाचे वेगळेपण - दुधापासून तयार करण्यात आलेली अनेक पेयं बाजारात सध्या आहेत. मात्र त्या सर्वांमध्ये हे पेय वेगळे असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. आमच्या पेयामुळे ताकद तर मिळेलच; परंतु तब्येतीवर त्याचे कोणतेच दुप्षरिणाम होणार नाहीत, कारण यामध्ये सर्व नैसर्गिक घटक वापरण्यात आले आहेत, अशी माहिती वैज्ञानिकांनी दिली.
एकच फ्लेवर -बाजारातील अनेक पेयं वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात; परंतु या उत्पादनाचा फ्लेवर एकच असेल आणि तो सर्व वयोगटातील सर्वांना आवडेल. हलक्या बदामी रंगाचे हे पेय असेल.
बहुगुणी पेय -या नवीन पेयामध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्याचे साईड इफेक्ट तर नाहीतच; परंतु रक्तदाब, मधुमेह, पोटातील जंत, खोकला, यासारख्या रोगांमध्ये उपयुक्त ठरू शकेल.

Next Article

Recommended