आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाष्ट्यातून मिळते आनंदाची ऊर्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला नाष्टा आनंदासमान अनुभव देतो, हे आपल्याला माहीत आहे काय? नाष्टा कुटुंबासोबत असेल तर आनंद व विश्वासात वाढ होते. मात्र, त्यासाठी तुम्हाला आनंदाने नाष्टा करावा लागेल.

दररोजच्या कटकटी, ट्रॅफिक जॅम, गृहपाठ, पार्किंगमधील भांडण व त्यानंतर नोकरी किंवा शाळेतील अपमानास्पद स्थितीत आनंदात राहण्याची ऊर्जा नाष्ट्यातून मिळते. अमेरिकेच्या मार्टिन लष्करी रुग्णालयाच्या न्यूट्रिशन केअर डिव्हिजनच्या मते, लोकांना नाष्ट्याचा फायदा माहीत आहे, मात्र तो त्याहूनही परिणामकारक काम करतो. नाष्ट्यात काहीही चालते. फळे, ब्रेड किंवा अन्य एखादा अन्नपदार्थ. घरातून काही खाऊन बाहेर पडल्यास तुम्ही आव्हानांना तोंड देण्यास सज्ज राहता. नाष्टा केला नाही तर रक्त शर्करा कमी होते. परिणामी चिडचिड, थकवा जाणवतो व कामात सुस्ती व आळस येऊ शकतो. असे कोणाला आवडेल? आठ तास झोपल्यानंतर पोटात काही राहत नाही. अशात थोडेफार खाल्ल्यास झोपेतून मिळालेली ऊर्जा यामुळे आणखी वाढते.