आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही चांगल्या व आरोग्यदायी सवयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले आरोग्य आपल्या रोजच्या आवडीनावडीवर अवलंबून असते. त्यापैकी काही सवयी जर आपल्या दिनचर्येचा भाग बनल्या तर त्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात. सर्वच सवयी एकाच वेळी आत्मसात करण्याऐवजी दर महिन्याला एक सवय जडवू शकता.

०हे जास्त खा : हेल्दी फॅट्स (शेंगदाणे आणि ऑलिव्ह ऑइलपासून मिळतात) आणि कमी प्रोटीन असणारा आहार उपयोगी असतो. प्रत्येक वेळी आहारात समावेश केल्यास प्रदीर्घ काळासाठी आहाराची गरज भासत नाही.
०मसालेही उपयोगी : मीठ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर नसले तरी मसाले आरोग्यासाठी लाभदायी असतात. तुळस, ओवा, लिंबूचा रस यांचे सेवन करावे. यामुळे मेटाबोलिझम वाढते. ओव्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. काळ्या मि-यांमुळे जळजळ कमी होऊ शकते, असे चेन्नईच्या आहारतज्ज्ञ धारिणी कृष्णन यांनी सांगितले.
०रिफाइंड अन्नधान्य टाळा : पास्ता, भात, केक, कुकीज आणि नाश्त्यात अगदीच मीठ बंद करण्याची गरज नाही. पण त्याचे प्रमाण नियंत्रणात हवे. भोजनात अन्नधान्याचे प्रमाण अर्धे असावे, असे आहारतज्ज्ञ ईशी खोसला यांचे म्हणणे आहे.
०कोठेही करा भोजन : आपण भोजन एखाद्या खास ठिकाणीच करायला हवे हे गरजेचे नाही. तर स्वच्छ पद्धतीने तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद कोठेही घेता येईल. तरीही मांसाहार, गोड, मद्य यापासून दूर राहा. सूप अधिक घ्या. उपाशी राहू नका.
० व्हिटॅमिन डी घ्या : भारतीयांमध्ये सामान्यपणे याचे प्रमाण कमी असते. त्यांना डॉक्टर तास-अर्धा तास उन्हात राहण्याचा सल्ला देतात. प्रमाण अधिक कमी झाल्यास औषधीद्वारे घ्यावे लागते. 6 ते 8 आठवड्यात पुन्हा सरासरी प्रमाण मिळते.
० बेडरूम फक्त झोपण्यासाठी : बेडरूममध्ये मोबाइल ठेवू नका, टीव्ही नसावा किंवा काही कामही करू नका. झोपण्यापूर्वी तासभर आधीच सगळ्या स्क्रीन बंद करायला हव्या. कॉम्प्युटर आणि टीव्हीचा निळा प्रकाश झोपेच्या हार्मोनमध्ये गडबड करतो.
० विचार करून खा : नेहमी टेबलवर बसून खा. अन्न व्यवस्थित चावून खा. टीव्हा पाहताना खाणे बंद करा. कारण त्यामुळे किती खाल्ले याचा अंदाज येत नाही.
० ओमेगा 3 गरजेचे : हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आहे. यामुळे जळजळ कमी होते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांवरही गुणकारी ठरते. मेंदूसाठी लाभदायक ओमेगा 3 शरीरात तयार होत नाही. मासे, तीळ, अक्रोड, मोहरी, सोयाबीन आणि पालेभाज्यांच्या माध्यमातून मिळवता येईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा 100 ग्रॅमपर्यंत घेता येईल.
० व्यायाम टाळू नका : काही मिनिटांपर्यंत धावणे शक्य होत नसेल तरी चालणे टाळू नका. किमान 20 मिनिटे चाला. त्यात 30 सेकंद वेगाने आणि पुन्हा हळू चाला. असे करत रहा. काहीच शक्य नसेल तर पाच मिनिटांत 12 सूर्यनमस्कार तरी घालावे, असे रिबॉकच्या मास्टर ट्रेनर निशा वर्मा यांनी सांगितले.
० घाम निघू द्या : ट्रेडमिलवर चालणे हीच एकमेव व्यायामाची पद्धत असल्याचे दिसत आहे. त्याऐवजी तुम्ही एखादा खेळ खेळूनही घाम निघू द्यायला हवा. पोहलात तरी चालते, पण शरीर थकायला हवे, असे अमेरिकेच्या कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या दिनाज वेरावतवाला म्हणाल्या.
० दिवसभर सक्रिय राहा : वेळ मिळत नसेल तर फोनवर बोलता बोलता पायी चाला. एस्केलेटरऐवजी पाय-यांचा वापर करा. सकाळी व्यायाम करत असाल आणि दुपारी झोप घेत असाल तर ते चुकीचे ठरेल. आरोग्यदायीही ठरणार नाही. पूर्ण दिवस सक्रिय राहाल असे काहीतरी करा.