आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयास होणारे नुकसान टाळा,लक्षात ठेवा या बाबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्याच्या शरीरात हृदय सर्वात महत्त्वपूर्ण अंग आहे. तो मांसपेशींनी बनलेला एक पंप आहे, जो संपूर्ण शरीराला रक्त उपलब्ध करत असतो आणि यासाठी तो १ मिनिटाला ७२ वेळा ठोके पडतात.

हृदयरोगामुळे मृत्यूचे भारतात मोठे प्रमाण वाढले आहे. यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे की, काही गोष्टी आपण समजून घ्याव्या. जेणेकरून हृदयाचे आजार दूर राहतील. हृदयात दुखणे, श्वास घेण्यास अडचण आणि लवकर थकवा आल्याने हृदयाशी संबंधित काही प्रमुख आजारांचे प्रारंभीचे लक्षणे आहेत. अनेक रुग्णालयात इलेक्ट्रो कॉर्डियोग्राफ, ईको कॉर्डियोग्राफ व पीईटी स्कॅनची सुविधा आहे, ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांच्या गोष्टींचा उलगडा सहज होऊ शकरतो. हृदयाच्या रुग्णांनी उपचारापूर्वी हे लक्षात घ्यावे की, ज्या रुग्णालयात ते उपचार घेणार आहेत, तेथे उपचाराचे सर्व गरज असलेले मशीन व इक्विपमेंट उपलब्ध आहेत की नाही. जीवनशैलीत दुरुस्ती करून यापासून वाचता येऊ शकते. यासाठी ५ गोष्टी ...

- रोज फळ ,भाजीपाला खावा. परंतु तिच भाजी खावी ज्यात मिठाचे प्रमाण कमी आणि फायबरची मात्रा अधिक असेल.
- सप्ताहात पाच दिवसांपर्यंत ४५ मिनिटे वेगाने फिरावे.
- कोणत्याही तंबाखू उत्पादनांपासून दूर राहा. जसे- सिगारेट, गुटखा आदी हे कोठे ना कोठे हृदयाशी संबंधित आजारांचे कारण बनतात.
- मानसिक तणाव हृदयासाठी धोकादायक आहे. याला आपल्या हृदय-मनावर पोहोचवू नका.
- एकंदरीत, आरामदायक आणि तणावग्रस्त जीवनशैलीला जोडून आपण आपल्या हृदयाचे चांगल्या तऱ्हेने लक्ष ठेवू शकतो.

एक तथ्य हे आहे की, अल्कोहल काही वेळा हृदयासाठी चांगले ठरते. सप्ताहात ५ दिवस, दिवसाला २ पैग मद्य हृदयास नुकसानकारक नाही, तर ते हृदयासाठी चांगले आहे. दरम्यान, सर्व गोष्टींसारखीच मद्याची अधिक मात्रा हृदयासाठी धोकादायक आहे. सोबत ते हाय ब्लड प्रेशर, हार्ट फेल्युअर आणि कॅलरींची मात्रा वाढवते. त्यासाठी मद्यपान घ्या, परंतु कमी प्रमाणात घ्यावे, जेणेकरून नुकसान कमी होईल. - डॉ. के. बी. प्रसाद, सीनियर कन्सल्टंट कॉर्डियोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल, बंगळुरू