आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकारापासून सुटकेसाठी वाढत्या वजनाकडे लक्ष ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन अभिनेता जेम्स गेंडोलफिनीचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या निधनाने काही पैलूंवर कटाक्ष टाकण्याची वेळ आली आहे. गेंडोलफिनीची उंची सहा फुटांपेक्षा जास्त होती. त्याचे वजन 136 किलो होते. धोकादायक रूपात मोठ्या आकाराच्या शरीरामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विशाल होते. वजन वाढवण्यात तणावाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. कोणी सेलिब्रिटी यापासून वाचू शकत नाही. कॉर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन आपल्या सामान्य आहारावर परिणाम करतात. भूक लागलेली नसते तरीही ते खाण्याची इच्छा चाळवतात.

जास्त खाणे त्या वेळी धोकेदायक होऊन बसते जेव्हा अतिरिक्त चरबी पोटात जमा होऊ लागते. ही चरबी किडनीला वेढा घालते. किडनी शरीरातील रक्तदाब नियंत्रित करीत असल्यामुळे स्थूल व्यक्तीला हायपरटेन्शनचा मोठा धोका असतो. हे हृदयविकार आणि ब्रेनस्ट्रोकचे मुख्य कारण आहे. ज्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका येतो, त्यातील अर्धेअधिक दगावतात. कारण त्यांना जोखमीच्या कारणांची माहितीच नसते. किंवा ते इशार्‍याचा संकेत समजू शकत नाहीत. सावध राहिल्यास जीव वाचू शकतो.

हृदयाची घ्या अशी काळजी
> कमरेचा घेर तुमच्या कमरेचा घेर नाभीजवळ तुमच्या उंचीच्या निम्म्यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला तपासणीची गरज आहे.
> साखर, मीठ व चरबी या गोष्टीकडे लक्ष ठेवा, की साखर, मीठ जास्त खाल्ल्याने आणि चरबी वाढल्याने मधुमेह, उच्च् रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल तर वाढत नाही ना ?
> श्वासात चढ-उतार काही पायर्‍या चढल्यानंतर श्वास फुलल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. धाप लागणे आणि श्वास फुलणे हृदयविकाराचे संकेत आहेत.
> रात्रीचे जेवण रविवारी रात्री तुमच्या जेवणात काय होते ? साप्ताहिक सुटीच्या दिवसांतील जेवण आणि येणार्‍या आठवड्याच्या तणावामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण बर्‍याचदा सोमवारी सकाळी आढळते.