आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदी राहण्यासाठी सतत मदत करत रहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते, ‘सूर्य अस्ताला गेला तरी छोटासा दिवादेखील अंधार दूर सारतो.’ आपल्या जीवनाचा चांगला काळ सुरू असेतोपर्यंत चुका करत असतो. परंतु, आपल्या जीवनाचा वाईट काळ सुरू होतो, तेव्हा मात्र आपण घाबरतो. त्यामुळे जीवनात दिवा लावून ठेवणे केव्हावी चांगले, जीवनात काही दिवस ग्रहणाचे आले तरी आपल्याला आवश्यक तो प्रकाश मिळत असतो.
याचाच अर्थ असा की जीवनाचा वाईट काळ सुरू असतानाही आपण चांगले आणि सकारात्मक विचार बाळगले पाहिजेत. यामुळे जीवन उजळण्यास मदत होते. काही वर्षांपूर्वीची कथा आहे. एका परिसंवादात मी लोकांना प्रश्न विचारायला सांगितले. एकाने म्हटले की, त्याला त्याच्या आसपास दु:खच दिसते. त्याला आनंदाचे क्षण गवसत नाहीत. तेव्हा मी त्याला त्याच्या नोकरी, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि कौटुंबिक बाबींविषयी विचारले. त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावरून वाटले की त्याने या स्थितीत आनंदीच असावे. परंतु काही कारणांमुळे तो दु:खी असतो. त्याला समोर बोलावले. तुला आनंदी असावं असे वाटते का, असे त्याला विचारले.
मी म्हणालो, तुम्ही आनंदी राहू इच्छित असाल तर मी काही चांगले करू शकतो. त्याला माझे म्हणणे पटले. तेव्हा मी समोर बसलेल्या तिघांना पुढे येण्यास सांगितले. जो माणूस दु:खी होता त्याला एकाने मागून पकडले, जेणेकरून तो आपले हात हलवू शकणार नाही. एकाने पाय पकडून ठेवले. तिस-याने त्याचे तोंड बंद केले. पुढील 45 सेकंद त्या दु:खी माणसावर उपचार सुरू झाले. तो अस्वस्थ होऊ लागला. 60 सेकंद पूर्ण होत नाही तोवर तो सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला. तिघांनी त्याला पकडून ठेवले होते. त्याने स्वत:ला सोडवून घेतले. काही दीर्घ श्वास घेतले आणि जिंकल्याची अनुभूती घेत तो म्हणाला की, मी दुस-यांदा श्वास घेतल्याने खूप आनंदी आहे. चहा पिताना मी पाहिले की तो लोकांशी बोलण्याचा आनंद घेत होता. त्याला पुन्हा एकदा जिवंतपणाचे अनुभव येत आहेत.
आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती की आपल्याला तहान लागली असेल तर साधे पाणीही रुचकर लागते, परंतु तहानच लागली नसेल तर कशातच रुची वाटणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तहान लागली पाहिजे तरच तहान भागल्यावर आनंदाचा अनुभव येईल. जीवनात याचा अनुभव येण्यासाठी ईश्वराची कृपा समजून जगायला शिकले पाहिजे. ही ती कृपा आहे जी दुस-यांची मदत करू शकते. ज्या लोकांनी दुस-यांची मदत करत जीवन व्यतीत केले त्यांनी ख-या अर्थाने भरपूर जीवन अनुभवले. आपण सदैव आपल्यातील चांगल्याचे आकलन करून घेतले पाहिजे.