आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रिय मते घेणाऱ्या हिलरींना आहे क्लिष्ट पार्श्वभूमी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्लोट आल्टर
विजेते लोक इितहास लिहितात. पराभूत लोक जर नशीबवान असतील तर त्यांच्या नावे एखादी गाथा येऊ शकते. हिलरी क्लिंटन यांनी तीन दशकांपर्यंत अॅडव्होकेट,पहिल्या महिला, सिनेटर आणि विदेश मंत्री या भूमिकेतून इतिहास लिहिला होता. पण जी कामे त्यांनी केलेली नाहीत ,त्याबद्दल त्यांची आता आठवण काढली जाईल. हिलरी यांच्या निवडणूक प्रचाराच्या पोस्टमार्टेममध्ये पराभवाची घातक कारणे काही कमी नाहीत. अनेक अंदाज चुकले. अध्यक्षपदाची पहिली निवडणूक लढविणारी महिला उमेदवार आणि महिलांचा उघड अपमान करणारे ट्रम्प यांची लढाई लिंगभेदावरून झाली नाही.

निवडणूक वर्षामध्ये अमेरिकेतील विविध भागांमधील मतदारंाशी चर्चचा करताना काहीजणांनी सांगितले की, महिला उमेदवारास निवडून नवी सुरूवात करणे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे नाही. काही लोकांसाठी आर्थिक समस्या, सांस्कृतिक मूल्ये आणि गदलाची इच्छा हे मुद्दे महत्वाचे होते. ज्या ७० टक्के मतदारंानी सांगितले की, महिलांबद्दल ट्रम्प जे बोलतात,त्यामुळे चिंता वाटते. त्यातील २९ टक्के लोकांनी ट्रम्प यांना मतदान केले आहे. हिलेरी यांना सर्व म्हणजे ५४ टक्के मते मिळाली. पण ट्रम्प यांना ८८ टक्के रिपब्लिकन महिला, ५२ टक्के गोऱ्या महिला, ६१ टक्के कॉलेज डिग्री न घेतलेल्या महिलांनी मते दिली आहेत. २५ लाख लोकप्रिय मतांची आघाडी मिळवूनही हिलेरी व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.

हिलेरी,अमेरिकेच्या इतिहासात अन्य कोणत्याही महिलेच्या तुलनेत दोन वेळा अध्यक्षपदाच्या जवळ पोहोचल्या होत्या. महिलांसाठी समानाधिकाराच्या लढाईत त्यांच्या माेहिमांना भले अपयश मिळाले तरी त्यांनी दुसऱ्यासाठी मार्ग तरी आखून दिला. पण हे निश्चित झाले की, २०१६ ची निवडणसूक ही लिंगभेदाशी संबंधित नव्हती पण त्यांची राजकीय वर्चस्व अबाधित ठेवणारी अशीच होती. सर्व विरोधानंतरही हिलेरी या जगातील एक सन्मानित महिला आहेत. गॅलपने तर त्यांना तब्बल २०वेळा अमेरिकेच्या प्रशंसनीय महिला म्हणून जाहीर केलेले आहे.

न्यूर्यार्कच्या खासदार आणि परराष्ट्र सचिव भूषविलेल्या हिलेरी यांचे रेटिंग ६० टक्के राहिले पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते उपयोगाला आले नाही.दुसऱ्या बाजूला अशा रिपब्लिकन महिलांचीही कमी नाही की ज्यांना हिलेरी यांच्या पराभवामुळे दिलासा वाटला. ट्रम्प यांच्या विरोधातील रिपब्लिकन रूथ मल्होत्रा म्हणतात की, बराक ओबामा यांच्याप्रमाणे हिलेरी आणि मतदार यांचा ताळमेळ जमला नाही. रूथ यांनी तिसऱ्या उमेदवारास मतदान केले. प्रामाणिक डेमोक्रॅट महिलांनाही वाटते की, हिलेरी या जास्त चपळ आणि कमी वादग्रस्त असत्या तर बरे झाले असते. शेरिल सँडबर्ग आपले पुस्तक लीन इनमध्ये लिहितात की, मेकिन्से रिपोर्टनुसार पुरूषांचे प्रमोशन हे क्षमतेवर आधारित असते तर महिलांचे अनुभवावर. यासाठी त्या ह्युलट पेकार्ड यांच्या संशोधनाचा हवाला देतात. त्यानुसार पुरूष ६० टक्के पात्रता पूर्ण करून पमोशन मिळवितात पण महिलांना १०० टक्के पात्रता परीक्षा द्यावी लागते. डेमोक्रेट महिला उमेदवारांसाठी निधी गोळा करणाऱ्या मर्सी स्टेट म्हणतात की, महिला अध्यक्षपद निवडणूक इतकी सोपी असती तर अात्तापर्यंत आम्ही एखाद्या महिलेला निवडले असते.
बातम्या आणखी आहेत...