आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते घेरिया, विजयादशमीला बांधकाम सुरू झाल्याने बदलले नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयदुर्ग या किल्ल्याचे पूर्वीचे नाव घेरिया असे होते. विजयादशमीच्या दिवशी याचे काम सुरू केल्यामुळे त्याचे नाव विजयदुर्ग असे पडले. या किल्ल्यावर जेथे तोफेच्या तोंडी देण्याची जागा आहे त्यास फांजी असे म्हटले जाई. ज्या ठिकाणी बंदुका ठेवून मारत त्यास जंगी असे म्हटले जाई. मुख्य प्रवेशद्वारास यशवंत दरवाजा असे नाव आहे. १६६४ मध्ये सर जे. नार्मल यांनी या किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लावला होता.

या किल्ल्याचा इतिहास
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजाभोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्या नंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
विजयदुर्गला पुर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० कि. मी. लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याच शक्ती स्थान आहे. कारण मोठी जहाज खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत. मराठी आरमारातील जहाज या खाडीत नांगरून ठेवली जात पण ती समुद्रावरून दिसत नसत.

भौगोलिक माहिती
मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर हा किल्ला आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे.या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत.या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे होते.

पुढील स्लाईडवर पाहा, विजयदुर्गाचे मनमोहून टाकणारे PHOTO