आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबीर-गुलालाचा संदेश : आपले रक्षण आपल्याच हाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी हा रंगांचा उत्सव. हे रंग जीवनातील आशा आणि उत्साहाचे प्रतीक आहेत. परंपरांनी या रंगाला अधिक घट्ट बनवले आणि सण-उत्सवांनीही गेल्या हजारो वर्षांत आपले रूप बदलले. भारतीय परंपरांचे हेच तर वैशिष्ट्य आहे. स्वत:मध्ये काळानुरूप बदल घडवण्याच्या या गुणामुळेच आज या परंपरांची जपणूक शक्य होत आहे.

रंगांचे हे जग असे आहे की, येथे कुणी उच्च नाही, ना कुणी नीच. या जगात सर्वच समान आहेत. ज्या काळात रासायनिक रंग माहीत नव्हते त्या काळात नैसर्गिक रंगांची उधळण होती. तेव्हा लोकसंख्याही एवढी भरमसाट नव्हती. नद्यांमधून बारा महिने स्वच्छ पाणी वहायचे. मात्र, गेल्या पन्नास वर्षांत चित्र पालटून गेले आहे. आजची अवस्था त्यापेक्षा कितीतरी वाईट आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे.
आपल्याला परंपरा जर पूर्वजांकडून मिळाल्या असतील, तर जलस्रोत आणि हिरवाई आपल्या याच पूर्वजांचा वारसा आहे. म्हणून आपण आता भावी पिढीचा विचार करायला हवा. त्यांना सर्वसमृद्ध जीवन प्राप्त व्हावे, हीच आपली इच्छा असणार यात काहीच शंका नाही.
म्हणूनच होळीनिमित्त कोरड्या रंगांचे आज महत्त्व आहे. कोरड्या रंगांची होळी आपला वारसा जपण्याच्या दृष्टीने सर्वांत पहिले आणि महत्त्वाचे पाऊल आहे. पाणी जीवन आहे म्हणूनच पाण्याचा एक थेंब जीवनाइतकाच अमूल्य आहे. गेल्या काही वर्षांपासून कोरडी होळी साजरी करून आपण उद्यासाठी पाण्याची बचत करत आहोत. चालू पिढीलाही याची पुरेपूर जाणीव झाली आहे. या माध्यमातून सर्वांचे रक्षण सर्वांच्याच हाती आहे हे या पिढीला चांगले ज्ञात आहे.

या वर्षीही रंगांसोबत अशीच आनंदाची उधळण करा. अबीर-गुलालाचा हा संदेश मात्र विसरू नका की, आपण सर्वांसाठी आहोत.
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रमेशचंद्र अग्रवाल,
चेअरमन, दैनिक भास्कर समूह