आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी महिन्यांत सलग सुट्यांची मौज, दिवाळीला एक सुटी घेतली की सलग नऊ दिवस...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील महिन्यापासून सण आणि सुट्यांचा सुकाळ सुरू होईल. आॅगस्टपासून डिसेंबरपर्यंत दर महिन्यास ४-५ दिवसांचा वीकेंड मिळणार आहे. या महिन्यांत रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद, नवरात्र, दसरा, दिवाळी, ख्रिसमस यांसारखे मोठे सण येत आहेत.
ऑगस्टमध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि १६ ला रविवारची सुटी आहे. १७ ला एक सुटी घेतल्यानंतर १८ रोजी पारसी नववर्षाची सरकारी सुटी आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन वेळेस दीर्घ सुटीची संधी मिळत आहे. १७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनंतर १८ ला तुम्हाला एक सुटी घ्यावी लागेल. यानंतर १९-२० ला शनिवार-रविवारची सुटी येईल. याच पद्धतीने २४ रोजी बकरी ईद साजरी केल्यानंतर २५ ची एक सुटी घेतल्यानंतर पुन्हा २६-२७ ला शनिवार-रविवारचा वीकेंड आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या सुटीसोबत ३ आणि ४ ला वीकेंडचा आनंद घेता येईल. याच महिन्यात २२ रोजी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा रजा घ्या आणि नंतर २४-२५ रोजी वीकेंडसह सलग चार दिवस सुटी घेऊ शकता.

२६ तारखेला रजा घेतली तर २७ ऑक्टोबरला पुन्हा वाल्मीकी जयंतीची सुटी येत आहे. नऊ दिवस सर्वात अधिक सुट्या नोव्हेंबर महिन्यात आहेत. ७-८ तारखेला वीकेंड, ९ तारखेला धनत्रयोदशी, १० ला नरक चतुर्दशी, ११ ला दिवाळी, १२ तारखेला किरकोळ रजा टाकली की बस. १३ तारखेला भाऊबीज आणि १४-१५ ला वीकेंड साजरा करायला मोकळे. डिसेंबरमध्ये लास्ट वीकेंड ४ दिवसांचा आहे. गुरुवारी २४ ला ईद-ए-मिलाद, शुक्रवारी २५ ला नाताळ अाणि पुन्हा २६-२७ ला शनिवार-रविवार. आनंदीआनंदच!