आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निडर अधिकारी: सरकार चुकत असेल, तर त्यावरही रोखठोक मत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांनी सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करायची, तेच करत आहेत. यापैकी एक आहेत सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा, तर दुसरे डॉ. के. सी. चक्रवर्ती. दोघेही पूर्वेकडील राज्यांमधील आहेत. दोघेही बँकर आहेत आणि विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलेले. उदार अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने नियंत्रणाचा प्रयत्न केल्यास सिन्हा विरोध करतात, तर दुसरीकडे अर्थमंत्री पी. चिदंबरम अधिक कर्ज वाटण्याच्या धोरणाचे समर्थन करतात तेव्हा चक्रवर्ती ते चुकीचे असल्याचे विधान करतात. जाणून घेऊयात या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल.


०उपेंद्रकुमार सिन्हा : सेबीचे अध्यक्ष
> जन्म : 2 मार्च 1952
> शिक्षण - गोपालगंज (बिहार) च्या सरकारी शाळेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण. पाटणा सायन्स कॉलेजमधून फिजिक्समध्ये (ऑनर्स) आणि फिजिक्समध्येच एमएस्सी पाटणा विद्यापीठातून एलएलबी.
> वडील : फुलदेव प्रसाद (वकील आणि स्वातंत्र्यसैनिक)
कुटुंब : डॉ. शबनम सिन्हा (पत्नी), जागतिक बँकेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, दोन मुले.
पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच सिन्हा यांची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी निवड झाली होती. तीन वर्षे बँकेत काम केल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. 1976 च्या बॅचचे आयएएस सिन्हा 6 वर्षे सिवान, गिरीडीह आणि पाटणा येथे जिल्हाधिकरी होते. त्यांची प्रथम नियुक्ती जमशेदपूरमध्ये एसडीएमपदी होती. त्याचवेळी त्यांनी कामातील चुणूक दाखवून दिली होती. धातूचा कचरा उचलणा-या आदिवासींसाठी त्यांनी सहकारी संस्था सुरू केली. एका वर्षातच या संस्थेअंतर्गत मुलांसाठी शाळा, चर्च, वैद्यकीय महाविद्यालय चालवले जाऊ लागले. त्यानंतर अर्थमंत्रालयात बँकिंग विभागासाठी त्यांची निवड झाली. यूटीआयचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
गालीब आणि साहिर यांचे चाहते असणा-या सिन्हा यांची उर्दू भाषेवरही पकड आहे. कविता म्हणजे प्रोग्रेसिव्ह लिटरेचर आहे आणि त्या माध्यमातून दुस-या जगात जाता येते, असे ते म्हणतात. त्यामुळे शास्त्रीय संगीताचे चांगले कलेक्शन त्यांच्याकडे आहे. रोज रात्री त्याचा आनंद सिन्हा घेतात. सेबीच्या कर्मचा-यांना सर्वप्रथम मार्गदर्शन करताना ते म्हणाले होते की, ‘न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझे होने ने, न होता मैं तो क्या होता.’ जेव्हा त्यांचे कुटुंब सोबत असते, तेव्हा शास्त्रीय संगीताची मैफल हमखास रंगते, पण पत्नी दिल्लीत आणि मुले न्यूयॉर्क व लंडनमध्ये असल्याचे तशी संधी फार मिळत नाही. चार अर्थमंत्र्यांबरोबर काम केलेले सिन्हा यांची ओळख सरकारचे संकटमोचन अशी आहे.