आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\' प्रेम, चारा कापण्याच्या यंत्राने तोडले मुंडके तर कुठे चाकूने चिरला गळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही महिन्यांपासून चर्चा असलेला नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. जात-पातअशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ एकमेकांवर खरे प्रेम करणारे आर्ची अन् परशा आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांच्या प्रेमावर घाला घालणारी समाजव्यवस्था यावर या चित्रपटातून भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ऑनर किलींग सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला नागराज मंजुळे यांनी हात घातला आहे.

फँड्रीसारख्या सिनेमानंतर आता नागराज मंजुळे नवीन काय घेऊन येणार याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. त्यात सैराटचे प्रमोशन सुरू झाल्यापासून तर मराठी चित्रपटाच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लागले होते. या चित्रपटाची गाणी, प्रोमो पाहता एक अस्सल लव्ह स्टोरी पाहायला मिळणार याची सर्वांनाच खात्री पटली होती. तसेच वारंवार सांगण्यातही आले होते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना ज्या प्रमाणे आर्ची परशाच्या प्रेमाने आनंद दिला तसाच या चित्रपटात मांडण्यात आलेल्या विषयाने पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांनी प्रेक्षकांना आणि पर्यायाने समाजाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.

ऑनर किलींग सारख्या विषयाला चित्रपटातून हात घालत नागराज मंजुळे यांनी अगदी सहजपणे यावर भाष्य केले आहे. पण हा केवळ चित्रपटात दाखवण्याचा विषय आहे असे नाही. प्रत्यक्षातही खोट्या प्रतिष्ठेसाठी प्रेम करणाऱ्यांना ठार करून असुरी आनंद मिळवण्याच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. काही हिंदी भाषक राज्यांत तर खाप पंचायतींच्या माध्यमातून असे अनेक प्रकार घडतात आणि समोरही येत नाही. महाराष्ट्रही त्यात मागे नाही. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातदेखिल ऑनर किलिंगच्या काही घटना घडल्या आहेत. त्या घटना वाचल्यारवर हे खरे आहे का.. असा विचार मनात येऊ तुम्हीही सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही..

पुढील स्लाइड्सवर वाचा, भावानेच केली बहीणीची हत्या... कोल्हापुरातील हादरवून सोडणारी घटना...