आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प कोणाला भेटणार हे ठरवतेय २७ वर्षीय युवती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होप हिक्स, प्रसिद्धी सचिव
वय- २७ वर्षे
शिक्षण - द. मेथॉडिस्ट विद्यापीठाची पदवी
वडील -पॉल हिक्स जनसंपर्क फर्ममध्ये
चर्चेत का - अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांची माध्यम सचिव आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यादरम्यान होण्याची शक्यता आहे. ट्रम्प आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या माध्यम सचिवाकडे लक्ष जाणे स्वाभाविक आहे. होप हिक्स नामक २७ वर्षीय तरुणी या पदावर आहे. तिची मुलाखत घेण्यासाठी कॉस्मोपॉलिटनने विचारणा केली असता तिने स्पष्ट नकार दिला. बॉसची मुलाखत घ्या, माझी नव्हे, असे ती म्हणाली. लो प्रोफाइल राहून काम करणे तिला आवडते. होपचे आजोबा आणि वडील जनसंपर्क क्षेत्रात काम करत.

ऑगस्ट २०१४ मध्ये होप ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पच्या फॅशन लेबल आणि रिसॉर्टसाठी काम करू लागली. ५ महिन्यांनी ट्रम्प यांनी होपला कार्यालयात बोलावले. मुलीसोबत नव्हे, माझ्यासोबत काम कर, असे सांगितले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचार मोहिमेची जबाबदारी तिला दिली. इवांकाचे काम करताना होप हिल्टिजक स्ट्रेटजीज या पीआर फर्ममध्ये नोकरी करत होती. या कंपनीचे संस्थापक मॅथ्यू हिलरींसाठी काम करत होते. कंपनीकडे होपविषयी ट्रम्प यांनी विचारणा केली. कंपनीने नकार दिला. आपल्या सक्षम पीआरला आपण देऊ शकत नसल्याचे कंपनीने म्हटले. मात्र, ट्रम्प यांनी तिला आपल्या चमूत सामील करून घेतले.

ट्रम्पकडून डिक्टेशन घेऊन ट्विट करण्यासाठी कर्मचाऱ्याला देण्याचे तिचे काम आहे. पत्रकारांना टाळत नाही अशी तिची ख्याती आहे. तिला टीव्हीवर येणे आवडत नाही. ट्रम्पची अपॉइंटमेट घेण्यासाठी शेकडो अर्ज रोज तिच्याकडे येतात. कोणासोबत बैठक ठरवायची याचा निर्णय संपूर्णपणे तिच्या अखत्यारीत अाहे. आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर होपचे स्थान महत्त्वाचे असेल, असे ट्रम्प म्हणतात.
बातम्या आणखी आहेत...