आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉलीवूड चित्रपटात भयपटांचे साम्राज्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेक लेखक करेल केपेकने १९२० मध्ये स्वत:चे नाटक आरयूआरमध्ये (रोसम्स युनिव्हर्सल रोबोट) रोबोट शब्दाचा वापर केला होता. नाटकाचा अंत रोबोटच्या हातून - एक व्यक्ती एलक्विस्ट नामक क्लर्कला सोडून संपूर्ण मानवी सभ्यतेच्या विनाशाने होतो. अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अलट्रानमध्ये खलनायक एक रोबोट आहे. २१ जुलैला प्रदर्शित होणार्‍या टर्मिनेटर जेनिसिसमध्येही खलनायक रोबोट आहे. ते मानवांना नष्ट करू इच्छिता. २२ मे रोजी प्रदर्शित टुमारो लँडमध्ये खलनायकाचा विश्वासू सेवक रोबोटचीही इच्छा आहे की, मानवता स्वत: समाप्त व्हावी.

रोबोटचा धोका काल्पनिक आणि सांकेतिकएेवजी आता वास्तविक वाटत आहे. १९८४ पासून प्रदर्शित होणार्‍या टर्मिनेटर सिरीजमध्ये पाच अभिनेते जॉन कोनोरची भूमिका निभावत आहेत. आगामी चित्रपटात सारा कोनोरला अनेक टर्मिनेटर ट्रेनिंग देतात. ती आपल्या आई-वडिलांना मारून टाकते. चित्रपटात एका आश्चर्यकारक ट्विस्टमध्ये ६७ वर्षीय अर्नोल्ड श्वार्झनेगरचे यद्ध १९८४ च्या अर्नाेल्ड श्वार्झनेगरसोबत होते. हॉलीवूडपटांत भीतीची लाट आलेली दिसेल. १२ जूनला प्रदर्शित होणार्‍या ज्युुरासिक वर्ल्डमध्ये वैज्ञानिकांनी चार डायनासोरच्या डीएनएद्वारे एका नवीन हायब्रीड डायनासोरची निर्मिती केली आहे. हिटमॅन : एजंट ४७ आनुवंशिक मारेकरी आहे. तो वेडा होतो. तो जेनेटिकली बनवण्यात आलेल्या ४६ हत्यारांमुळे अधिक खतरनाक आहे.

प्रदर्शनाच्या मार्गावर असलेले अ‍ॅक्शन आणि भयपट
सॅन अँड्रिएस (29 मे) - ड्वेन जॉन्सन दैवी आपत्तीपासून लोकांना वाचवण्यासाठी संघर्ष करतो. चित्रपटात कॅलिफोर्निया समुद्रात बुडण्याची भीती आहे.

बिग गेम (26 जून) - अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विमान फिनलंडवर पाडण्यात येते. राष्ट्राध्यक्ष (सॅम्युुअल जॅक्सन) धनुष्यबाणधारी एका युवकाच्या मदतीने दहशतवाद्यांचा सामना करतात. हा फिनलंडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे.

अँट मॅन (17 जुलै) - पाल रड सुपरहीरोच्या भूमिकेत आहे. वेळ पडल्यास हीरो छोटा होतो. या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

मिशन इम्पॉसिबल - रोग नेशन (31 जुलै) - टॉम क्रूझच्या चित्रपटाचा हा पाचवा भाग आहे. इथान हंट आणि त्यांचा चमू सिंडिकेट नावाच्या खलनायकाचा शोध घेत असतात.
बातम्या आणखी आहेत...