आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ किलोची शस्त्रे, २४ तास शत्रू, १५ सेकंदांत मांस झडण्याचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहेत काश्मीरमधील सैनिक. त्यांच्याकडे झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग आहे आणि राहण्यासाठी घर म्हणजे बंकर. कधीही गोळीबार होऊ शकत असल्याने येथे सतर्क राहणे गरजेचे आहे. हवेचा वेग २० नॉट असतो. त्यामुळे त्वचा फाटते. जखम होते. शस्त्रे एवढी थंडगार असतात की ग्लोव्हजशिवाय पकडल्यास बोटे कापली जातात. पाय बर्फात अडकतात तेव्हा बर्फाचे पाणी होऊन बूट आणि नखे गळतात. तरीही ते चालत राहतात आपल्यासाठी. त्यांचा निर्धार सांगणारा उपमिता वाजपेयींचा वृत्तांत.

१. दर महिन्याला वजनात अडीच किलोची घट
काश्मीर खोऱ्यात आॅक्सिजन कमी असतो. सुविधा असूनही दर महिन्याला वजन दोन ते अडीच किलोने कमी होते. श्वास घेणे कठीण होते. त्याचा परिणाम शरीरावर होतो. पर्वतीय भागामुळे पाय समतल जमिनीवर पडत नाहीत. त्यामुळे ऊर्जाही जास्त लागते.
२. हातपाय धुणे विसरले तर शरीर झडू लागते
ग्लेशियरमध्ये ६ महिन्यांची ड्यूटी लागते. तापमान उणे ४० अंश. ड्यूटीनंतर हातपाय गरम पाण्याने धुवावे लागतात. पायाला बर्फ लागलेला असेल तर शरीर झडण्याचा धोका वाढतो. ग्लोव्हज आणि बूट योग्य रीतीने घातले नाहीत तरी शरीर झडू शकते.
३.उभे राहण्यासही जागा नसते बंकरमध्ये
बहुतांश चौक्या पर्वतांवर आहेत. त्या लहान असतात. नियंत्रण रेषेवरील बंकर दगड, माती, पोती आणि धातूच्या पत्र्यापासून बनवावे लागतात. जवानांचे कार्यालय आणि घर त्यातच असते. त्यातच ते आळीपाळीने काही काळ विश्रांती घेतात.
४.चालण्यानेही दम लागतो तरी शरीरावर ४० किलो वजन, तरीही धोका
सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचे वजनच १२ ते १५ किलो असते. त्यात रायफलचे मॅगझिन १ किलोचे. डोक्यावर कपडे आणि धातूपासून बनवलेला पटका ३.५ किलोचा. हातात चार किलोची एके-४७ रायफल किंवा ६ किलोची एलएमजी. कधी १५ किलोचे रॉकेट लाँचर. म्हणजे शस्त्रास्त्रांचे वजनच २५ किलोपर्यंत. त्यात बर्फाच्या दिवसांत ४ किलोचे जॅकेटही.
५. शत्रूची नजर थेट अनेक चौक्यांवर
काही चौक्या अशा आहेत की त्यांच्यावर थेट शत्रूची नजर पडते. तसा बोर्डही तेथे लावलेला असतो. तेथे सर्व हालचाली रात्रीच होतात. मग चौकीवर जाणे असो की सामान पोहोचवणे असो. काही भागात हमाल मिळतात, पण शस्त्रास्त्रे आणि काडतुसे जवानांनाच न्यावी लागतात.
६. घरी बोलण्यासाठीही ४ महिने
नियंत्रण रेषेवर आपल्या बहुतांश चौक्यांवर मोबाइल कनेक्टिव्हिटी नाही. कंपनी मुख्यालयात लँडलाइन फोन असतो. हिवाळ्यात काही चौक्यांचा संपर्क चार महिन्यांसाठी तुटतो. तेव्हा ज्या सैनिकांची ड्यूटी असते तेव्हा चार महिन्यांनंतरच कुटुंबीयांशी बोलणे होते.
७.आजारी माणसाला १० किमी दूर आणावे लागते : प्रत्येक कंपनीत नर्सिंग असिस्टंट असतात. बटालियनमध्ये एक निवासी वैद्यकीय अधिकारी असतो. तेथे औषधांचीही सुविधा असते. अनेकदा इमर्जन्सीत सैनिकांची तब्येत जास्त खराब असल्यास त्यांना खांद्यावर उचलून चौकीखाली ९-१० किमी पायी आणावे लागते.
८ कोरडे अन्न, पाणीही मिळणे कठीण
कारवाईला गेल्यावर चार-चार दिवस मठ, चॉकलेट, सुका मेवाच खावा लागतो. ग्लेशियरमध्ये पाणी पिण्यासाठी स्वच्छ बर्फ घेण्यासाठी ५० फूट खाली जावे लागते. नंतर बर्फ गरम करून, पाणी स्वच्छ करणाऱ्या गोळ्या टाकतात. तेव्हा पाणी पिण्यायोग्य होते. त्याला ३-४ तास लागतात.म्हणजेच अन्न-पाणी मिळणेही कठीणच.
बातम्या आणखी आहेत...