आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीत होतात पैसे खर्च करण्यावरून वाद , असे वागलात तर वाढेल तुमच्यात प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी केला आहे)

लग्न अरेंज असो वा लव्ह पण, तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही की, तुमचा जोडीदार तुमच्या सारखाच विचार करणारा असेल. आज प्रत्येकाच्या गरजा वाढल्या आहेत. त्यामुळे घरातील नवरा-बायको दोघेही कामावर जाणा-याची संख्या वाढली आहे. दोघेही काम करत असल्याने प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र हवे आहे. कामाचा ताण आणि व्यक्तीगत आयुष्य सोबत घेवून जाताना ब-याच जोडप्यांमध्ये वाद होत असल्यचे चित्र आहे.

1. एकमेकांवर आर्थिक निर्भरता नाही...

वर्किंग कपल्स एकमेकांवर आर्थिक स्वरूपात निर्भर नसतात. त्यामुळे दोघेही मनात येईल तसा खर्च करतात. अशात जर कुणी एकाने खर्चाचा हिशोब मागितला तर दोघात वाद होण्यास सुरुवात होते. दोघेही कमवणारे असल्याने आपण कमावलेला पैसा स्वत:च्या मर्जीनुसार खर्च करण्यचा अधिकार आपल्याला असावा असे दोघांना वाटत असते.

कसा काढाल मार्ग -

हे 100 टक्के खरे आहे की, तुम्ही कमावलेल्या पैशावर तुमचा अधिकार असावा. परंतु खर्च करण्याआधी जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी त्यावर चर्चा केल्यास त्याला समाधान वाटेल आणि दोघांमध्ये आत्मस्म्मान टिकून राहण्यास मदत होईल.

पैशामुळे नात्यात येणारी कटूता कशी दूर करावी हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...