आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरीच बनवा जपानी डीश 'सुशी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- जपानी डिश सुशी)
जपान हा देश संपूर्ण जगभरात तेथील कल्चरसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला येथे गेल्यानंतर तेथील लोकांच्या सभ्यतेसोबत येथे मिळणारे खाद्यपदर्थ देखील मनापासून आवडतील. जपानमध्ये तयार होणा-या पदार्थामध्ये 'सुशी' नावाचा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे.विशेष म्हणजे हा पदार्थ जगभरात सर्व ठिकाणी आवडीने खाल्ला जातो. जर तुम्हाला इटालियन,चायनीज पदार्थ खाणे आवडत असेल तर सुशी डिश तुम्हाला नक्कीच आवडेल. आज आम्ही तुम हाला सुशी कसे बनवले जाते याची रेसीपी सांगणार आहोत.

काय आहे सुशी-
ही एक जपानी डिश आहे. जी तादूळ,सीफूड आणि भाज्या एकत्र करुन बनवण्यात येते. हा पदार्थ बनवण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती आहेत. हा पदार्थ बनवताना जपानमध्ये मासे आणि तादूळ एकत्र करुन बनवण्याची पद्धत आहे. जपानी भाषेत सुशीचा अर्थ 'खुप आंबट' असा होतो.

नॉर्थ अमेरिका आणि यूरोपमध्ये सुशी कॅलिफोर्निया रोल, अवेकेडो, कानी कामा, काकडी आणि टोबिको टाकून तयार करण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी सुशीच्या रोल्समध्ये बीन्स, स्प्राउट्स, गाजर, अवेकेडो, काकडी, मिर्ची आणि तिखट मसालेदार पदार्थ टाकून बनवण्याची पद्धत आहे. तुम्ही हा पदार्थ तयार करण्यासाठी पांढरा अथवा ब्राउन तांदूळ वापरु शकता.

रेसिपी:

जपानमध्ये सुशी पांढ-या तांदळात बनवण्याची पद्धत आहे. यासाठी तांदूळ,विनेगर, साखर,मीठ एकत्र केले जाते. आणि नंतर त्याला कोबी टाकून सजवले जाते. रोल्समध्ये वरील सर्व पदार्थ भरल्यानंतर हलके ठंड करुन घ्या. जपानमध्ये वापरण्यात येणारे पांढरे तांदूळ आकाराने लहान आणि चिकट असतात.याच वेगळेपणामूळे येथे जावून सुशी खाण्याचा आनंद काही निराळा आहे.