आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फाळ तलावात अडकले हरिण, सुरक्षा रक्षकांनी वाचवले प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला जीव धोक्यात घालून एखाद्या प्राण्याचा जीव वाचवण्याची उदाहरणे फार कमी आहेत. कॅनडातील न्यू ब्रन्सविक परिसरात अशीच एक दुर्मिळ घटना घडली. येथील अग्निशमन विभागाला एका बर्फाळ तलावात एक हरिण अकडल्याची सूचना देणारा फोन आला. मूस जातीचे हे हरिण सामान्य हरणापेक्षा थोडे मोठे असते.

शेडियाक अग्निशमन विभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत हरिण किनाऱ्यापासून २५ ते ३० फूट लांब गेले होते. तलावात खूप बर्फ जमा झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुऱ्हाडीने बर्फ फोडून रस्ता तयार केला. त्यानंतर एक कर्मचारी हरणापर्यंत पोहोचला. कित्येक तासापासून अडकलेले हरिण भयभीत झाले होते. कर्मचाऱ्याने त्याला धक्का मारून रस्ता दाखवला व अखेरीस हरणाचे प्राण वाचले.

शेडियाक अग्निशमन विभागाच्या फेसबुक पेजवर या घटनेची दृश्य आणि छायाचित्र अपलोड करण्यात आले आहेत. दोनच दिवसांत हे
दृश्य ९० हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी या कर्मचाऱ्यांचे ‘ब्रेव्ह मॅन’ अशा शब्दांत कौतुक केले.
}facebook.com

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...