आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात जेवढे हसाल तेवढे आनंदी राहाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदात शारीरिक किंवा मानसिक त्रासाला कोणतेही स्थान नसते. आनंदी वातावरणात आपण आध्यात्मिक ऊर्जेने भारलेले असतो. एखाद्या गोष्टीच्या उणिवेबाबत विचार केला की आनंद संपुष्टात येतो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी संतुष्ट राहण्याच्या काही पद्धती समजून घ्या. सर्वात आधी तुम्ही सर्वाधिक आनंदी होता तो क्षण आठवा. त्या वेळेला तुम्ही माझ्याकडे सर्वकाही आहे, असा अनुभव घेत होता, म्हणून खूप आनंदी होता. उणिवांचा विचार केल्यास दु:ख होते. एक लहान मूल दिवसातून 200 वेळा हसते तर मोठा माणूस फक्त 20 वेळा. एक म्हण आहे, ‘केवळ आनंदाचा देखावा म्हणून मी हसत नाही तर मी आनंदी आहे म्हणून हसत आहे.’
आनंदाविषयी एक जपानी कथा आहे. आपणास ज्ञानप्राप्ती झाली की नाही हे जाणन घेण्यासाठी एक भिक्खू खूप आतुर होता. मी ज्ञानप्राप्तीच्या समीप आहे की नाही, असे तो आपल्या गुरूला सारखे विचारत होता. गुरू नेहमी त्याला संयम राखण्यास सांगत आणि म्हणत, जेव्हा तुला ज्ञानप्राप्ती होईल, तेव्हा तुला हा प्रश्न विचारण्याची गरजच पडणार नाही. अनेक वर्षे लोटली. त्याने आपल्या गुरूंना हा प्रश्न विचारणे बंद केले. एका भिक्खूूप्रमाणे आयुष्य जगू लागला. काही वर्षांनी गुरूंचा मृत्यू झाला. एके दिवशी बाहेरून आल्यावर शिष्याने झोपडीचा दरवाजा उघडला. आत प्रवेश करताच त्याला खिडक्या उघड्या दिसल्या. काही सामान चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. भिक्खूने विचार केला, खिडकीतून चोर आत घुसला असेल आणि काही छोट्या-मोठ्या वस्तू घेऊन पसार झाला असेल. त्याच्या खिडकीतून पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सहज दिसत असे. भिक्खू उद्गारला,‘खिडकीबाहेर हा चंद्र ठेवून गेलास, त्याबद्दल खूप धन्यवाद चोरा.’ जेव्हा आपण चहुबाजूंना समाधान आणि संपन्नतेचा अनुभव घेतो तेव्हापासून आपल्या जीवनात आनंदाचा प्रवास
सुरू होतो. हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित राजेश खन्नाच्या ‘बावर्ची’ सिनेमाचे उदाहरण घेऊ. तो आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टींची प्रशंसा करण्याची शिकवण संपूर्ण कुटुंबाला देतो. उपलब्ध साहित्याच्या साहाय्याने जो चविष्ट अन्नपदार्थ बनवतो, त्याला बावर्ची म्हणतात. सिनेमातील बावर्चीचे पात्र छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी राहण्याचे उपाय सांगते. आनंदी दिवसाचा बावर्ची बनण्यासाठी आज आणि दररोजच हसत राहा.