आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवसभर अभ्यास आणि रात्री चहा विकत होते हे दोघे भाऊ, पण आता शिकणार IIT मध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून वडील जितेंद्र कुमार, सुमित, अमित आणि आई मंजूदेवी)
जालंधर- गेल्या वर्षी दोघांना आयआयटी खडकपूर आणि रुडकीमध्ये जागा मिळाली होती. मात्र प्रवेशासाठी मिळालेल्या चार दिवसांमध्ये त्यांचे चहा विकणारे वडिल जितेंद्र कुमार फिससाठी आवश्यक असणारे पैसे भरू शकले नाहीत. तेव्हा त्यांचे ते स्वप्न अपूर्णच राहिले. पण या दोघांनी हिंमत न हारता या वेळी पुन्हा आयआयटीमध्ये चांगला रॅंक मिळवला आहे.
आयआयटीची परिक्षा तोंडावर असतानाच वडिलांना मोटारसायकलने उडवले. असा परिस्थितीत हे दोघे धैर्याने पुढे आले. वडिलांना चालता फिरता येत नव्हते. त्यामुळे या दोघांनीच चहाची टपरी संभाळली. ते स्वतःच चहा कारखान्यांमध्ये नेऊन द्यायचे.
ही गोष्ट आहे दोन भावांची. ही कथा आहे ज्यांनी एकाच खोलीत राहुन सलग दुसर्‍यांदा आयआयटीची परिक्षेत यश मिळवले आहे त्या अमित आणि सुमितची.

यंदाचा गुरूवार त्यांच्यासाठी खुपच आनंदाचा होता, ही मुले आयआयटीच्या परिक्षेत पास झाली. अमृतसरजवळील चौगिट्टी चौकात वीस वर्षांपासून चहाची टपरी चालवत असलेल्या जितेंद्र कुमार दररोज प्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानावरच होते. जेव्हा भास्करचे पत्रकार त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा ते जवळच असलेल्या दुकानात आणि कारखान्यांमध्ये चहा देऊन परतत होते. गेल्या वर्षी त्यांच्या मुलांनी आयआयटीच्या परिक्षेत यश मिळवले होते, मात्र ते फिस भरू शकले नाही. काहींनी सांगितले होते की, फायनान्सरांना जाऊन भेटा. मात्र ते शक्य नसल्याने त्यांनी कसे तरी मुलांना समजावले. पुढल्यावर्षी पुन्हा प्रयत्न करू असा दिलासा दिला.
वर्ष उलटले, दोन्ही मुले पुन्हा आयआयटी परिक्षा उत्तीर्ण झाले. परंतु झोपडपट्टीतील एका खोलीत भाड्याने राहणार्‍या जितेंद्र आणि त्यांची पत्नी मंजू देवी यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे. यावर्षीही फिस भरली नाही तर, आयआयटीचे दरवाजे त्यांच्या मुलांसाठी यावर्षीही बंदच राहणार आहेत. मात्र ते म्हणतात नाः देवाची ज्याच्यावर कृपा आहे, तोच पुढील रस्ताही दाखवतो.
अमित-सुमितने जेईईमध्ये कोणता रॅंक मिळवलाय पाहा पुढील स्लाईडवर...